योगा हा निरोगी जिवणाचा मूलमंत्र ;सीताराम गावडे

ऑर्बिट योगा स्टुडिओ चा व्दितीय वर्धापन व जागतिक योगा दिन उत्साहात साजरा

जागतिक योग दिनाच्या निमित्ताने योगाची विविध प्रात्यक्षिके सादर

सावंतवाडी प्रतिनिधी
निरोगी जिवन जगायचे असेल तर डॉक्टरांच्या मागे न लागता योगाची साधना करा, निरोगी आयुष्यासाठी योग ही एकमेव गुरूकिल्ली आहे,ऑर्बिट योगाच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षात योगाभ्यास करणाऱ्यांनी अनेक आजारांवर मात केली आहे, त्यामुळे सर्वानीच योगा कडे वळणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन सकल हिंदू सामाजाचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष तथा कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज चॅनेल चे सीताराम गावडे यांनी ऑर्बिट योगा स्टुडिओ च्या व्दितीय वर्धापनदिनाच्या व जागतिक योगा दिनाच्या उध्दघाटन प्रसंगी बोलताना केले.
यावेळी व्यासपीठावर उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर ऐवळे,डॉक्टर शिरीष चौगुले ,डॉक्टर अमृता स्वार, डॉक्टर गणपत्ये,निवृत्त शिक्षक भरत गावडे, पतंजलीचे महेश भाट, वेध शाळेचे प्राध्यापक कशाळीकर, संदीप कुडतरकार ऑर्बिट योगा स्टुडिओ चे संचालक अमोल सोनवणे,विनेष तावडे,आदी उपस्थित होते
यावेळी बोलताना सिताराम गाडे म्हणाले योगाला जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे, देवाधिदेव शंकर यांनी अफाट शक्ती ही योग व ध्यानधारणेमुळे प्राप्त केली त्यांचे तांडव नृत्य हे योग साधनेचा एक भाग आहे. शरीरातील सर्व अवयव सुदृढपणे कार्यान्वित राहायचे असतील तर गोळ्यांपेक्षा योगा त्यावर प्रभावी औषध आहे .या योगाची कास धरल्यावर निरोगी जीवनशैली आपल्याला जगता येईल त्यासाठी तंत्रशुद्ध योगाची गरज आहे तो योगा ह्या ऑर्बिट योगा स्टुडिओ मध्ये शिकवला जातो त्याचा प्रत्येकाने लाभ घेणे गरजेचे आहे असे आवाहन केले.
तर निवृत्त शिक्षक भरत गावडे यांनी योगामुळे जीवनशैली उत्साही बनते, उत्साह वाढतो ,सकारात्मक ऊर्जा तयार होते व शरीर निरोगी राहते ,त्यामुळे प्रत्येकाने योगा करणे गरजेचे आहे असे स्पष्ट केले तर योगप्रशिक्षक अमोल सोनवणे यांनी गेल्या दोन वर्षातील योगा स्टुडिओची कामगिरी विशद करून या योगामुळे अनेक जणांना अनेक आजारांवर मात करता आली असे स्पष्ट केले .
यावेळी योगा शिकण्यासाठी येणाऱ्या योगा प्रशिक्षणार्थ्यांनी नऊ ग्रुपच्या माध्यमातून वेगवेगळ्या योगा कला सादर केल्या त्यातून तीन ग्रुप ना नंबर देण्यात आले तर दोन ग्रुपला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले व इतर ग्रुपला सन्मानपत्र मेडल देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम धुरी यांनी केले तर आभार प्रशिक्षक अमोल सोनवणे यांनी माणले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page