माणगाव (मिलिंद धुरी)
आज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघाचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वाडोस महायुतीची सभा संपन्न झाली.यावेळी कुडाळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालका अध्यक्ष आर.के.सावंत यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत नारायण राणे यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी उपाध्यक्ष संदीप राणे, तालुका उपाध्यक्ष रवी म्हाडगुत, तालुका उपाध्यक्ष दिंगबर धुरी,तालुका सचिव संतोष सावंत,शिवसंग्राम संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत,ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष सर्वेश पावसकर,जिल्हा कार्यकारिणी सदस्य मनोहर साटम,सदस्य श्री.बांदेकर किरण सावंत,विशाल खोचरे, प्रसाद साटम,भूषण देसाई आदी उपस्थित होते.
वाडोस येथे केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा कुडाळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्वागत…
