सावंतवाडी(प्रतिनिधी)
तळवडे ता.सावंतवाडी येथे उत्कर्ष कला क्रीडा मंडळ, भैरेवाडी आयोजित कार्यक्रमास विशाल परब यांनी उपस्थित राहून बंधू-भगिनींशी संवाद साधत कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
आयोजित विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण होत असते. एका अर्थाने गावकऱ्यांचा एकोपा या निमित्ताने पाहायला मिळतो. सर्वांनी गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन यावेळी विशाल परब यांनी केले.
