कणकवली प्रतिनिधी
बीडवाडी येथील शिवसेना उबाठा गटाचे माजी विभागप्रमुख दिलीप उर्फ दादा भोगले यांनी आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. भोगले यांच्या या प्रवेशामुळे बीडवाडीत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
पक्षप्रवेशाच्यावेळी जि. प. चे माजी अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत, माजी सभापती दिलीप तळेकर, संदीप सावंत, राजू हिरलेकर, दत्ता काटे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. आमदार नीतेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे असल्याचे त्यांनी सांगितले.