२ मे ला सावंतवाडीत महायुतीच्या प्रचार रॅलीच आयोजन…

संजू परबःशहरवासीय महायुतीच्या उमेदवार नारायण राणे यांच्यामागे उभे राहतील

सावंतवाडी प्रतिनिधी
महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे
यांना सावंतवाडी शहरातून ८० टक्के पेक्षा अधिक मतदान होईल. मोठं मताधिक्य त्यांना शहरातून दिलं जाईल. तर येत्या २ मे ला सायंकाळी ५ वाजता महायुतीच्या प्रचार रॅलीच आयोजन करण्यात आलं आहे. एक हजाराहून अधिक महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यात सहभागी होतील अशी माहिती भाजप प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली.

ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीचे वारे चालू आहेत. महायुतीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे उमेदवार आहेत. अडीच लाखांपेक्षा अधिक मताधिक्यानं ते निवडणूक येतील. शहरातून ८० टक्के मतदान त्यांना होईल. २ मेला सायंकाळी ५ वाजता महायुतीच्या प्रचार रॅलीच आयोजन करण्यात आलं आहे. शहरातून ही रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर व महायुतीचे नेते असतील. प्रचार कार्यालयाकडून या रॅलीचा शुभारंभ होईल. किमान १ हजार पेक्षा अधिक महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यात सहभागी होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या विकासाची माहिती नागरिकांना दिली जाणार आहे. महायुती सरकारनं शहरात मोठ्या प्रमाणात विकास केला आहे. त्यामुळे शहरवासीय महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्यामागे उभे राहतील अशी माहिती संजू परब यांनी दिली. याप्रसंगी भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे, चराठा उपसरपंच अमित परब आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page