सावंतवाडी प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचे आणि महायुतीचे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेचे अधिकृत उमेदवार मा श्री नारायणरावजी राणे साहेब यांच्या प्रचारार्थ इन्सुली डोबाचीवाडी येथे कार्यकर्ता सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सभेस उपस्थित राहून भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच उपस्थित जनसमुदायास संबोधित केले.
भारतीय जनता पक्ष हा कोकणच्या मातीत रुजलेला पक्ष आहे. कोकणकर जनता कायमच सन्माननीय राणे साहेबांच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. या निवडणुकीत राणे साहेब प्रचंड बहुमताने विजय होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
प्रसंगी गुरूनाथ पेडणेकर (माजी शिक्षण सभापती) बबन राणे (शिंदे गट तालुका प्रमुख) विठ्ठल पालव (इन्सुली भाजपा विभाग अध्यक्ष) नितीन राऊळ (भाजपा शक्ती केंद्र प्रमुख) वर्षा सावंत (ग्रामपंचायत सदस्य इन्सुली) साबाजी परब (सोसायटी सदस्य) अजय सावंत (भाजपा बूथ अध्यक्ष) नाना पेडणेकर (माजी उपसरपंच) औदुंबर पालव , महेंद्र सावंत , दिलीप पेडणेकर ,शिवा सावंत, सुनिल सावंत ,समीर सावंत, प्रल्हाद सावंत,प्रथमेश सावंत , देवदास सावंत, श्रीकृष्ण सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.