.
मालवण प्रतिनिधी
तालुक्यातील नांदरुख ग्रामपंचायतीचे सरपंच रामचंद्र उर्फ भाऊ चव्हाण, उपसरपंच दशरथ पोखरणकर यांच्यासह गावपॅनलचे सदस्य आणि ग्रामस्थांनी भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे, भाजपचे प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी भाजपात प्रवेश केला. यापूर्वी या गावावर शिवसेना ठाकरे गटाची सत्ता होती. मात्र येथील रस्ते, पाणी आणि विकासाचे मूलभूत प्रश्न सोडवण्यात ठाकरे गटाला अपयश आल्याने हा गाव भाजपमय केल्याचीऔ प्रतिक्रिया सरपंच भाऊ चव्हाण यांनी व्यक्त करत लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना ७५ ते ८०% मतदान देण्याचा निर्धार यावेळी केला. दरम्यान, भाजपाच्या माध्यमातून येथील विकासाचे प्रश्न निश्चितपणे सोडवले जातील, अशी ग्वाही निलेश राणे यांनी दिली.
नांदरुख गावावर यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाची सत्ता होती. मात्र मागील वर्षी झालेल्या ग्रा. पं. निवडणुकीत या गावावर गावपॅनलची सत्ता आली होती. या पॅनल मधील सरपंच रामचंद्र उर्फ भाऊ चव्हाण, उपसरपंच दशरथ पोखरणकर यांच्यासह गावपॅनलचे सदस्य नम्रता चव्हाण, समीक्षा चव्हाण, राजश्री कांबळी यांनी मंगळवारी निलेश राणे, दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी ग्रामस्थांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी चौकेचे माजी सरपंच राजा गावडे, भाजपाचे जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर, श्री.भोसले, मंदार लुडबे, रमेश चव्हाण, सागर चव्हाण, सत्यविजय कांबळी, चंद्रकांत चव्हाण, नंदू चव्हाण, सुरेश साळकर, राजेश चव्हाण, बाबू मांजरेकर, अमित गावडे तसेच गावातील अन्य ग्रामस्थ, मानकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.