निलेश राणेंचा धक्का; कुडाळ तालुक्यात उरल्या सुरल्या उबाठा गटाला सुरुंग…

अणाव,आंबडपाल शिवसेना उबाठा गटाच्या शाखाप्रमुखांचा भाजपात प्रवेश.

कुडाळ प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेत उबाठा शिवसेनेच्या अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांचे प्रवेश होताना दिसत आहेत. आज कुडाळ तालुक्यातील आणावं शाखाप्रमुख व आंबडपाल शाखाप्रमुख श्री. जयगणेश परब यांनी भाजपा नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी केंद्रीय मंत्री आणि महायुतीचे उमेदवार नारायणराव राणे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी आम्ही भाजपात सहभागी झालो असून विकासात्मक मुद्यांवर आम्ही भाजपा पक्षात सहभागी होत असल्याची माहिती प्रवेशकर्त्यानी दिली. यावेळी निलेश राणे यांच्यासोबत ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर, शिवसेना तालुकाध्यक्ष अरविंद करलकर, माजी जि. प. अध्यक्षा दिपलक्ष्मी पडते यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page