तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांच्या उपस्थितीत स्थानिक पदाधिकाऱ्यांचा प्रवेश…
कुडाळ प्रतिनिधी
तालुक्यातील घावनळे गाव म्हणजे पहिला काँग्रेस तर आता शिवसेनेचा बालेकील्ला मानला जातो. शिवसेना व काँग्रेस च वर्चस्व असलेल्या घावनळे मध्ये काल स्थानिक शिवसेना व काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. यावेळी जिल्हा बँक संचालक मा. प्रकाश मोरये, तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर कुडाळ तालुका सरचिटणीस भाई बेळणेकर संध्या तेरसे, सचिन घावनळकर, पली गाड, व स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. तर घावनळे गावातून जास्तीत जास्त मतदान राणे साहेबांना देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. तर अजूनही बरेच जन प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचे यावेळी पली गाड यांनी सांगितले.
