शिक्षक, पदवीधर विधानपरिषदेची निवडणुक पुढे ढकलली*श मुंबई प्रतिनिधीशिक्षक, पदवीधरच्या चार मतदार संघांसाठी जाहीर केलेली निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर, तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदार संघांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. या चार जागांसाठी येत्या १० जून रोजी मतदान होणार होते, तर १३ जूनला मतमोजणी केली जाणार…
जिल्ह्यातील महामार्गांवरील प्रवाशांना घातक ठरतील अशा होर्डिंग्ज तात्काळ हटवा
सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी जिल्ह्यातील सर्वच महामार्गांवर ठिकठिकाणी मोठ्या आकाराचे अनधिकृत होर्डिंग्ज उभारण्यात आलेले दिसत असून ते भविष्यात पावसाळ्यात महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तसेच रहदारीच्या नागरिकांना घातक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. कालच मुंबई घाटकोपर येथे एका पेट्रोल पंपाशेजारीच उभारलेले लोखंडी होर्डिंग कोसळून भीषण दुर्घटना घडून त्यात 14 नागरिकांचा मृत्यू तर 35…
प्रशासनाने आचारसंहितेचा बागुलबुवा दूर करून बीएसएनएलचे मोबाईल सेवा सुरळीत सुरू करावी:रुपेश राऊळ
सावंतवाडी (प्रतिनिधी)बीएसएनएलचे जाळे मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात विणले गेले असून अनेक टाॅवर उभे आहेत,पण ते नादुरुस्त झाल्याने सेवा मिळत नसल्याने ग्राहकांना दळणवळणाच्या मुख्य सेवेपासून वंचित राहावे लागत आहे, त्याकरिता प्रशासनाने आचारसंहितेचा बागुलबुवा दूर करून बीएसएनएलची मोबाईल सेवा सुरळीत सुरू करावी अशी मागणी ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीचे मतदान झाले आता…
सिंधुदुर्गला पावसाचा यलो अलर्ट जाहीर…
सिंधुदुर्ग प्रतिनिधीकोकणासह महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हवामान विभागाच्या वतीने दिनांक १३ मे पासून १५ मे पर्यंत यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये मुख्यत्वे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील काही भागात ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. तसेच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
भोसले इंटरनॅशनल स्कूलचा १०० टक्के निकाल
सावंतवाडी प्रतिनिधीसीबीएसईचा दहावीचा निकाल आज निकाल बोर्ड करण्यात आला. येथील स्थानिक यशवंत भोसले इंटरनॅशनल स्कूलने १०० टक्के निकाल दिला. एकूण ४२ विद्यार्थी विद्यार्थी बसले होते. मध्ये सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ० ०हून अधिक गुणांचे ए-वन श्रेणीत ७ विद्यार्थी, ८० विद्यार्थी उत्तरेहून अधिक गुणांचे ए-टू श्रेणीत १० व ७० उत्तरेहून अधिक गुणांच्या बी-वन श्रेणीत १३विद्यार्थी…
माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा रेडी देवस्थानतर्फे सत्कार…
वेंगुर्ला (प्रतिनिधी)रेडी माऊली मंदिरातील धार्मिक विधी निमित्त उपस्थित राहिलेले सावंतवाडी येथील माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा देवस्थानतर्फे सत्कार करण्यात आला. कोकणची अंबा म्हणून प्रसिद्ध असलेली रेडी येथील माऊली मंदिरात नुकतीच श्रीसत्यनारायण महापूजा संपन्न झाली. यावेळी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी यावेळी उपस्थित राहून श्री माऊलीचे व श्रीसत्यनारायण महापूजेचे दर्शन घेतले. त्यांच्या या भेटीदरम्यान, देवस्थानतर्फे…
वनविभागाच्या परिक्षेत्रात जंगलात तब्बल 35 ठिकाणी पानवठे तयार…
सावंतवाडी वनविभाचा पुढाकार.. सावंतवाडी प्रतिनिधीवस्तीकडे येणाऱ्या वन्य प्राण्यांना रोखण्यासाठी सावंतवाडी वनविभागाच्या परिक्षेत्रात येणाऱ्या जंगलात तब्बल ३५ ठिकाणी पाणवठे तयार करण्यात आलेइयाचा आधार घेवून ही राब नियंत्रण आली आहे. यासाठी वनविभाग आणि स्थानिक ग्रामस्थांचा हा उपक्रम राबता आला आहे. मध्ये नरेद्र संकटळे, ब्राह्मणपाट, कुभांर्ली, तांबु कोलगाव, माजगाव, इन्सुली, कुणकेरी आदि जंगलातील हे पाणवठे उभारण्यात आले आहेत….
सामंत ट्रस्ट मुंबईतर्फे गरजू व्यक्तींना धनादेश वाटप..
सावंतवाडी प्रतिनिधीसावंतवाडी येथील डॉक्टर परुळेकर नर्सिंग होममध्ये सामंत ट्रस्टमुंबईतर्फे गरजू व्यक्तींना धनादेश वाटप करण्यात आले. डिंगणेयेथील रक्तदाब व्याधीने पीडित प्रकाश सुतार, मोरगाव येथील मधुमेहआणि रक्तदाब या आजाराने पीडित शहाजी सावंत, कोंडुरे – मळेवाडयेथील अर्धांग वायू आणि अपंगत्व आलेले सुरेश पालयेकर आणिमधुमेह आणि रक्तदाब पिढीत चांदणी मुळीक, बिरोडकर – टेंबसावंतवाडी येथील रक्तदाब आणि दम्याच्या आजाराने त्रस्त…
महाराष्ट्र विधानपरिषद कोकण विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक-2024 कार्यक्रम जाहीर
कोकण विभाग पदवीधर मतदार संघासाठी 10 जून रोजी मतदान तर 13 जून रोजी मतमोजणी जिल्ह्यात 18 जून 2024 पर्यंत आदर्श आचारसंहिता लागू–जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर तावडे* सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील सदस्य निरंजन वसंत डावखरे यांची मुदत दिनांक 7 जुलै 2024 रोजी संपणार आहे. सदर जागेसाठी भारत निवडणूक आयोगाने कार्यक्रम…
यशवर्धन राणे यांना शिवसेना कडून पदवीधर संघाची उमेदवारी मिळावी,
युवा सेनेची मागणी:युवकांचा पुर्ण पाठिंबा असेल कुडाळ प्रतिनिधीयुवा फोरमचे अध्यक्ष अॅड. यशवर्धन राणे यांना कोकण पदवीधर मतदार संघातुन उमेदवारी मिळाल्यास राणे यांना युवकांचा पुर्ण पाठिबा असेल अशी भुमिका पत्रकार परिषदेत युवा फोरमच्या वतीने भुषण गावडे व दर्शन पाटकर यांनी जाहीर करीत, यशवर्धन राणे यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी शिंदेसेनेकडे करणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.कुडाळ येथे…
