साईश डी वाय पाटील फिजिओथेरपी काॅलेज चा प्रथ वर्षाचा विद्यार्थी*
सावंतवाडी प्रतिनिधी
कोल्हापूर कसबा बावडा येथील शाहू सर्कलचा महाराजा शाहू सर्कल सेवा भावी संस्था विरंजे पाणंद यांनी आयोजित केलेल्या रील स्पर्धेत डी वाय पाटील फिजिओथेरपी काॅलेज चा प्रथम वर्षाचा विद्यार्थी सावंतवाडी बिरोडकर टेंब येथील रहिवासी सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष व जेष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांचा मुलगा साईश गावडे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
शाहू सर्कल सेवा भावी संस्था विरंजे पाणंद यांनी गणपती रील स्पर्धा आयोजित केली होती यावेळी डी वाय पाटील फिजिओथेरपी काॅलेज मध्ये प्रथम वर्षाचा विद्यार्थी साईश गावडे यांनी गणपतीचे आगमन चे शुटींग करत अप्रतिम रील तयार केली होती