हरकुळ बुद्रुक येथील नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी धावले आ.नितेश राणे
कणकवली प्रतिनिधीतालुक्यातील हरकुळ बुद्रुक येथील शेखवाडी व खडक वाडी येथे वादळी वाऱ्यात नुकसान झालेल्या कुटुंबियांच्या मदतीसाठी भाजप आमदार नितेश राणे धावून गेले. या ठिकाणच्या पंधरा ते वीस घरांचे नुकसान या वादळी वाऱ्यात झालेले होते. घरांचे छत, छताचे पत्रे, कौले वाऱ्याने उडून गेली होती. तर काहींच्या घरावर झाडे पडून नुकसान झाले होते. या सर्वांना मदतीचा हात…
