लवकरच वसई पनवेल लोकल धावणार..

वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागणीला यश ; यशवंत जडयार

सावंतवाडी प्रतिनिधी
डहाणू पनवेल मार्गावर बोईसर, वसई, वाडा व भिवंडी परिसरात मोठया प्रमाणात इंडस्ट्रीज असून ह्या मार्गावर धावणाऱ्या मेमूच्या फेऱ्याही मर्यादित असल्याने वसई भिवंडी पनवेल मार्गावर मुंबई लोकल सुरू कराव्यात अशी वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने मागील अनेक वर्षापासून रेल्वे प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे सातत्याने मागणी होत होती. याला मुंबई रेल्वे विकास महामंडळाने मंजूरी दिल्याने वसई विरारकरांच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

तसेच वसई विरार परिसरात मोठया प्रमाणात कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्हातील लोकांची लोकवस्ती असल्याने त्यांना गावावरून येण्यासाठी पनवेल व्हाया दादर करून वसई विरार येथे येण्यासाठी ४ तासांचा वेळ लागतो
यासाठी वसई पनवेल मार्गावर लोकल सुरू झाल्यास चाकरमन्यांचे २ तास वाचतील असे अध्यक्ष श्री. अनिल मोरे यांनी सांगितले.

आज मुंबईमध्ये फक्त ऑफीसेस असून त्यांची सर्व मोठी वेअरहाऊसेस बोईसर, वसई, वाडा व भिवंडी परिसरात असल्याने येथे कामगारांची मोठी संस्था आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page