व्हॉइस ऑफ मिडीया सिंधुदुर्ग जिल्हा कुडाळ तालुका कार्यकारिणी जाहीर

तालुकाध्यक्ष पदी देवेंद्र गावडे तर सचिव पदी योगेश खाडे यांची नियुक्ती…

कुडाळ प्रतिनिधी
‘व्हॉइस ऑफ मीडिया’ ही संघटना ७८ देशामध्ये पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्रिय पद्धतीने कार्यरत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात संघटनेचा वाढता प्रभाव पाहता सिंधुदुर्ग जिल्ह्यातही संघटनेचा विस्तार वेगाने होत असून त्या अनुषंगाने आज कुडाळ तालुक्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी कुडाळ तालुकाध्यक्षपदी देवेंद्र गावडे तर सचिव पदी योगेश खाडे यांची निवड करण्यात आली.

व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे तसेच कोकण विभागीय अध्यक्ष कुमार कडलग यांच्या सूचनेनुसार व सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष (मुख्यालय) शैलेश मयेकर, उपाध्यक्ष सुयोग पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली ही खालील प्रमाणे तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

या कार्यकारीणीत
तालुकाध्यक्ष : देवेंद्र गावडे, सचिव : योगेश खाडे, कार्याध्यक्ष : राजेश हेदळकर, खजिनदार : प्रविण साठे, उपाध्यक्ष : अमित देसाई, प्रसिद्धी प्रमुख : अमोल गोसावी, सहसचिव : प्रसन्ना कोचरेकर, संघटक : जुबेर खान यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page