श्रम कामगार संघटना, महाराष्ट्र या संस्थेच्या महीला जिल्हाध्यक्ष पदी निवड

सिंधुदुर्ग प्रतिनिधी
गेली अनेक वर्षे सामाजिक कार्य करत असताना कामगार, उपेक्षित घटकांना न्याय मिळावा, त्यांचे हक्क मिळावे, त्यांच्या पाल्याना योग्य त्या सेवा मिळाव्यात यासाठी सातत्याने कामगार हितासाठी झटणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रणरागिणी मानसी परब – राणे यांची श्रम कामगार संघटना महाराष्ट्र या संस्थेच्या महिला जिल्हाध्यक्ष पदी निवड झाली आहे..

गेली अनेक वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कामगारांच्या चळवळीत सहभाग घेऊन कार्य त्या करीत आल्या आहेत. त्यांच्या समर्पित आणि कर्तृत्ववान कार्याची दखल घेऊन या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. नवनाथ मोडक, प्रा. डॉ. बी. एन. खरात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली.

एक संघटित कामगार.. एक सशक्त राष्ट्र या ब्रीदवाक्याप्रमाणे निश्चितच आपण कार्य करत राहणार. कारखाने, बांधकाम कामगार, वाहतूक क्षेत्र श्रमिक महिला, असंघटित कामगार, शेतमजूर व ग्रामीण कामगार या सर्वांनाच आता नक्कीच न्याय मिळवून देणार. त्याच प्रमाणे या सर्वांच्या पाल्याच्या भविष्यासाठी सुद्धा नक्कीच शासन दरबारी दाद मागेन असा विश्वास यावेळी नवोदित श्रम कामगार संघटना, महाराष्ट्र या संस्थेच्या महिला जिल्हाध्यक्षा मानसी परब राणे यांनी व्यक्त केला..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page