सिंधुदुर्गातील वीज-पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश
जिल्ह्यात ब्रेकडाऊन पथके चौवीस तास कार्यरत ठेवण्याचे निर्देश मुंबई प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सोमवारी मंत्रालयात तातडीची आढावा बैठक घेतली. जिल्ह्यातील वीज व पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करण्याबरोबरच नागरिकांशी सातत्याने संवाद ठेवण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले. एल-निनोमुळे भविष्यात हवामानातील बदलांची…
