सिंधुदुर्ग प्रतिनिधी
शासकीय मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये रुग्णांना सेवा मिळो अथवा ना मिळो; सत्ताधाऱ्यांना नेत्यांना त्याचा कधी फरक पडला नाही. शासकीय हॉस्पिटल मध्ये सत्ताधारी नेत्यांनी आपल्या बिनकामी कार्यकर्त्यांची फौज भरणा करून त्यांना भर पगारी पक्षाच्या कामासाठी जुंपले आहे. त्यामुळे हॉस्पिटल रुग्णसेवेसाठी नाही तर राजकारणाचा अड्डा झाला असून कार्यकर्ते डीनसोबत जणू बॉडीगार्ड बनून फिरताना दिसतात.
मिळालेल्या माहितीनुसार हॉस्पिटलकडच्या कंत्राटी भरतीत सत्ताधारी पक्षाशी निगडित नेत्यांच्या स्वयंघोषित स्वीय सहाय्यकांनी मोठया प्रमाणावर मलिदा गोळा गेल्याची चर्चा होऊ लागली आहे. करून काही कार्यकर्त्यांच्या हनी-बनीची गाणीगात जीवाची चैन करत आहेत अशी माहिती मिळते. हॉस्पिटलमध्ये काम करू नका ऑफिसच्या बाहेर बाकड्यांवर दिवसभर बसून रहा; तर काही शिकाऊ डॉक्टर देखील जीवाच्या चैनीसाठी रोज नवीन नवीन बकरे शोधून त्यांच्याकडून आर्थिक रसद घेऊन “हलाल” करीत आहेत याची जोरदार चर्चा आहे.
जिल्हा रुग्णालयात हे नेमके काय प्रकार चालू आहेत हे कळायला मार्ग नाही. सत्ताधारी नेत्यांना हॉस्पिटलशी सोयरसतक उरले नसल्याने हॉस्पिटल संस्था फक्त कार्यकर्त्यांच्या जीवाची चैन व अय्याशीचा अड्डा बनवण्यासाठी चालू आहे का असा प्रश्न समोर येत आहे. कार्यकर्त्यांच्या आलिशान गाड्याच्या या काळ्या काचांमधील आतले काळे प्रकार रोज उघडकीस येतं असून जनतेने यासाठी ह्या लोकांना सत्तेत बसवलं आहे का असा सवाल उपस्थित होतो आहे.
जिल्ह्याचा कारभार रामभरोसे चालू असून कार्यकर्त्यांचे कार्य “हनी” भोवतीच येऊन थांबते आहे हे दुःखद आहे.
