जबर मारहाण प्रकरणी शिवडाव येथील श्रीकांत तेली निर्दोष

संशयीताच्या वतीने ॲड.उमेश यांचा युक्तिवाद

कणकवली /प्रतिनिधी
शिवडाव ओटोसवाडी येथील प्रकाश दत्ताराम साळसकर यांना वैयक्तिक वाकडीकीतून जबर मारहाण करून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी शिवडाव येथील श्रीकांत राजाराम तेली याची येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शुभम लटुरिया यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले.

३ जानेवारी २०२० रोजी फिर्यादी प्रकाश साळसकर हे वाडीतील मारूती सावंत यांच्या घरी गेले होते. त्यांच्या कुंपनाजवळ कुणाचातरी बैल आला म्हणून हाकलण्यासाठी बाहेर आले असता जवळच घर असलेल्या आरोपी श्रीकांत तेली याने त्याला उद्देशून फिर्यादीने शिवीगाळ केल्याचा समज करून घेऊन आरोपी त्यांच्या अंगावर धावून आला. यावेळी त्याने हाताच्या बोटाला चावा घेत दांड्याने जबर मारहाण केली. यावेळी आरडाओरडीनंतर अन्य लोकही धावून आले. कणकवली येथील दवाखान्यात फिर्यादीला उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर आरोपीविरूद्ध भादंवि कलम ३२६, ३२५, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

याकामी सरकार पक्षातर्फे चार साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षीतील तफावती, पुरेसा वैद्यकीय पुरावा नसल्याने आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page