पशु पैदास केंद्र निळेलीच्या प्रक्षेत्रामध्ये गेली ५ ते ६ वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड?

अधिकाऱ्यांच्या संगणमताने वृक्षतोड;ग्रामस्थांचा गंभीर आरोप

वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दुर्लक्ष: वृक्षतोडीसाठी आवश्यक त्या परवानगी घेण्यात आल्या होत्या का? मात्र वनविभाग सुशेगाद

कुडाळ (निळेली)
कुडाळ तालुक्यातील पशु पैदास केंद्र, निळेलीच्या प्रक्षेत्रामध्ये गेल्या पाच ते सहा वर्षांपासून साग, खैर, कीनळ, आकेशिया आदी वृक्षांची मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर तोड झाल्याचा गंभीर ग्रामस्थांकडून केला जात आहे. वृक्षतोडीसाठी मात्र संबंधित आवश्यक त्या परवानग्या वनविभागाकडून घेण्यात आल्या होत्या का, याबाबतही ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ही वृक्षतोड पशु पैदास केंद्रातील वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने करण्यात आली असल्याचा संशय व्यक्त होत आहे‌‌.मात्र याकडे त्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोपही करण्यात येत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होऊनही संबंधित यंत्रणा आणि वनविभागाने काहीच कारवाई केली नसल्याचे दिसत नाही.वनविभाग मात्र सुशेगाद पाहायला मिळत आहे.मात्र या अधिकाऱ्यांना पाठीशी
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून वृक्षतोडीस जबाबदार असलेल्या अधिकारी व संबंधितांवर कठोर कारवाई करावी, तसेच शासनाच्या महसुलाचे झालेले नुकसान वसूल करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे “अधिकारी मात्र मालामाल, शासन मात्र कंगाल” अशी परिस्थिती निर्माण झाल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page