जिल्हाप्रमुख संजू परब यांचे कार्यकर्त्यांकडून सावंतवाडीत जंगी स्वागत,निवडणुका स्वबळावर लढण्याची आमची तयारी

पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी माझे प्रयत्न,कामातून त्या पदाची किंमत दाखवून देईल व:संजू परब

सावंतवाडी प्रतिनिधी
शिवेसना पक्ष मतदार संघ नंबर १ चा करण्यासाठी माझे प्रयत्न असणार आहेत. आगामी काळात होणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढण्याची आमची तयारी आहे. परंतू कोणताही निर्णय घेताना दीपक केसरकरांच्या शब्दाबाहेर जाणार नाही, अशी भूमिका शिवसेनेचे नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आज येथे व्यक्त केली. दरम्यान येणाऱ्या काळात सर्वांना सोबत घेवून काम करणार आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी माझे प्रयत्न राहणार आहेत. मिळालेले पद हे शोभेसाठी नाही तर कामातून त्या पदाची किंमत दाखवून देईन, असे त्यांनी सांगितले.

जिल्हाप्रमुख पद स्विकारल्यानंतर श्री. परब यांचे आज सावंतवाडीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी छोटेखानी कार्यक्रम आयोजित करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत श्री. परब बोलत होते.

यावेळी ते म्हणाले, माझ्यावर शिवसेना नेतृत्वाने जी जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी टाकली आहे. ती सार्थकी लावण्यासाठी मी निश्चितच प्रयत्न करणार आहे. हे पद देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आमदार दीपक केसरकर आणि माझे राजकीय गुरू निलेश राणे यांचे मी आभार मानत आहे. त्यांनी माझ्यावर विश्वास टाकल्यामुळे मला हे पद मिळू शकले. त्यामुळे येणाऱ्या काळ सावंतवाडी मतदार संघात शिवसेनेची ताकद नंबर १ करण्यासाठी सावंतवाडी मतदार संघात शिवसेनेची ताकद नंबर १ करण्यासाठी माझे प्रयत्न असणार आहेत. या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय आणि मानसन्मान देण्यासाठी आमचे प्रयत्न असणार आहे. आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि पालिका निवडणुका स्बळावर लढण्याची आमची तयारी आहे. परंतू अंतिम निर्णय हा आमदार दीपक केसरकर हेच घेणार आहेत. काही झाले तरी त्यांच्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही.

सावंतवाडी शहरात होणाऱ्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालय तसेच संकेश्वर-रेडी महामार्गाबाबत श्री. परब यांना छेडले असता. ते म्हणाले, केसरकर यांच्या माध्यमातून सावंतवाडी शहराचा विकास झाला आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा कारंजा मोती तलावात लावला जात आहे. त्याच बरोबर या आधीच्या काळात सावंतवाडीतील गार्डन, भाजी मार्केट आदी अनेक प्रकल्प हे त्यांनीच या ठिकाणी आणले. आता रुग्णालयाचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. हा प्रश्न जागेमुळे रखडला ही वस्तूस्थिती आहे. परंतू येणाऱ्या काळात हा प्रश्न मार्गी लागण्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जाणार आहेत, असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page