विश्वकर्मा सुतार समाज मेळावा कुंभारमाठ येथे उत्साहात संपन्न

सुशिक्षित आणि तरुण समाज बांधवांनी लोकांपर्यंत पोहोचून भोजलिंग काका सुतार समाज योजनेचा लाभ मिळवून द्यावा – विद्यानंद मानकर

सुतार समाज गुणवंत विद्यार्थ्यांचाही करण्यात आला गुणगौरव…!

मालवण प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य विश्वकर्मा समन्वय समिती मालवणच्या वतीने तालुक्यातील सुतार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आणि समाज बांधव मेळावा मालवण कुंभारमाठ जानकी मंगल कार्यालय येथे उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून विद्यानंद मानकर मुख्य समन्वयक महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय सुतार समाज समन्वय समिती, विश्वकर्मा क्रांती दल महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बाळासाहेब पांचाळ नांदेड, ज्येष्ठ मार्गदर्शक शिवाजीराव सुतार सातारा आणि पुणे शहरातील सुतार समाज संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

मालवण तालुक्यातील सुतार समाज गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते पार पडला यावेळी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करत असतानाच समन्वय समिती महाराष्ट्रच्या प्रयत्नातून प्रत्यक्ष वास्तवात आलेल्या संत भोजलिंग काका सुतार समाज आर्थिक विकास महामंडळाची माहिती विद्यानंद मानकर सर यांनी उपस्थित समाज बांधवांना दिली. सुतार समाज सामाजिक व आर्थिक विकासासाठी विविध लोकप्रतिनिधी, विविध संघटना यांचे कडून केली जाणारी मागणी विचारात घेऊन शासनाने सदर समाजांच्या सर्वांगीण विकास व आर्थिक उन्नतीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळातर्गत, उपकंपनी म्हणून ‘संत भोजलिंग काका सुतार समाज आर्थिक विकास महामंडळाची’ दि. ४/३/२०२५ रोजी शासन निर्णयानुसार स्थापना करण्यात आली. हे समन्वय
सामतीच्या व सकल सुतार समाजाच्या लढ्याला मिळालेले ऐतिहासिक यश आहे. असे ते म्हणाले, सध्या या आर्थिक विकास महामंडळासाठी ५० कोटी रुपयाचा वार्षिक निधी उपलब्ध झालेला असून तो संपूर्ण महाराष्ट्रात पूर्णपणे खर्ची व्हावा यासाठी सुशिक्षित आणि तरुण समाज बांधवांनी लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना त्याचा लाभ मिळवून द्या असे आवाहन मानकर सर यांनी केले.

विश्वकर्मा क्रांती दलाचे अध्यक्ष बाळासाहेब पांचाळ यांनी समाजावर होणारे अन्याय यावर परखडपणे बोलत असताना वेळ पडल्यास जशास तसे उत्तर द्या अन्याय करणाऱ्या बरोबरच अन्याय सहन करणारा सुद्धा तेवढाच गुन्हेगार असतो अशा प्रकारचे परखड असे मत त्यांनी मांडले.

आर्थिक सक्षमीकरण आणि सर्वांगीण विकास करा – आनंद मेस्त्री

राज्यातील सुतार समाज हा ग्रामीण भागातील बारा बलुतेदारांपैकी एक प्रमुख समाज आहे. प्रत्येक समाज घटकाच्या विकास हे राज्य शासनाचे उद्दिष्ट्य आहे. या भूमिकेतून आणि भावनेतूनच सुतार समाजासाठी स्वतंत्र महामंडळ निर्मिती झाली असून येत्या काळात भोजलिंग काका सुतार समाज महामंडळाच्या
मातून सुतार समाजातील विद्यार्थ्यांसाठी, माता भगिनींसाठी आणि तरुण उद्योजकांकरिता विविध योजना राबविता येत आहेत. त्यामुळे समाजाच्या मागणीचा सकारात्मक विचार केला आहे, यातून सुतार समाजासाठी विकासाची दिशा मिळू शकेल, असा विश्वास कोकण विभाग समन्वयक आनंद मेस्त्री यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण, तरुणींनी संघटीत होऊन काम करावे, व उद्योग व्यवसायातून आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरण आणि सर्वांगीण विकास करावा.

कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी सामाजिक विषयावर समाज बांधवांना मार्गदर्शन केले. तसेच जगप्रसिद्ध मूर्तीकार बाळकृष्ण उर्फ दाजी मेस्त्री यांचा मान्यवरांच्या हस्ते ‘समाज रत्न पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला.

या वेळी महाराष्ट्र राज्य विश्वकर्मा समन्वय समितीचे राज्य समन्वयक आनंद मेस्त्री, जिल्हाध्यक्ष शरद मेस्त्री, राजू मेस्त्री, प्रकाश मेस्त्री, बाबाजी मेस्त्री, विलास मेस्त्री, अरुण मेस्त्री, सौ अमिदी मेस्त्री, आरती मेस्त्री, अस्मिता मेस्त्री, राजश्री मेस्त्री, शंकर मिस्त्री, संतोष मेस्त्री, सचिन मेस्त्री, सुहानी मेस्त्री, कृष्णा मेस्त्री, महेश मेस्त्री, आशिष अनावकर, नंदू मेस्त्री, संजय मेस्त्री, दाजी मेस्त्री, भास्कर मेस्त्री,
जातील सर्व तालुक्यांचे सुतार समाज मंडळ यांचे अध्यक्ष, त्यांचे पदाधिकारी यांच्या समवेत म्हणून तालुक्यातील समस्त सुतार समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page