नेरुर जिल्हा परिषद मतदारसंघातुन मला स्थानिक उमेदवार म्हणून निवडुन दील्या मुळेच मी जिल्हापरीषदेवर सदस्य म्हणून पोहचु शकलो:रुपेश पावसकर

कुडाळ (प्रतिनिधी)
नेरुर जिल्हा परिषद मतदारसंघातुन लोकांनी मला स्थानिक उमेदवार म्हणून प्राधान्य दिले त्या मुळे भविष्यात कोणताही राजकीय निर्णय घेताना पहील्या प्रथम माझ्या लोकांचा निर्णय घेऊनच मी राजकिय वाटचाल करेन असे प्रतिपादन नेरुर जिल्हा परिषद मतदारसंघातुन निवडुन आलेले श्री रुपेश पावसकर यांनी सांगितले
नेरुर येथे ग्रामस्थांच्या वतीने हनुमान मंदिर नेरुर चव्हाटा येथे श्री पावसकर आणि पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे व पंचायत समिती सदस्या सौ दीप्ती नाईक या यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी श्री पावसकर बोलत होते ते बोलताना पुढे म्हणाले मी अपक्ष उमेदवार म्हणून उभा असताना मला उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते मा आमदार वैभव नाईक आणि बौद्ध महासभा तसेच वंचित,आघाडी व महाविकास आघाडीच्या वतीने तसेच नेरुर पंचक्रोशीतील लोकांनी पाठिंबा दील्यानेच मी धनाड्य शक्ती समोर टीकाव लागला असे श्री पावसकर यांनी सांगितले
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभु गावकर यांनि मनोगत व्यक्त करताना सांगितले कि नेरुर जिल्हा परिषद मतदार संघातील मतदारांनी इतिहास घडवला तसाच इतिहास विकास किमांतुन निवडुन आलेल्या उमेदवारांनी दाखवा असे आवाहन केले
_*मा आमदार वैभव नाईक यांच्या मुळेच निवडणूक रिंगणात _*यावेळी मा पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि आपण निवडणुक रेस मध्ये नव्हतो परंतु मा आमदार वैभव नाईक यांनी गेल्या दहा वर्षांत आपला कुठेही शब्द पडु दीला नाही तसेच वेळोवेळी ताकद दीली म्हणूनच आपली पत्नी सौ अर्चना बंगे हीला निवडणूक रिंगणात उतरवले असे स्पष्टीकरण श्री बंगे यांनी करुन भविष्यात श्री नाईक यांचा शब्द कुठेही पडणार नाही याची ग्वाही त्यांनी दिली
यावेळी पावसकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार श्री संग्राम प्रभु गावकर यांच्या हस्ते करण्यात आला तर दोन्ही पंचायत समिती सदस्या यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय लाड यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page