माणगाव खोऱ्यातील आंबा काजू बागायतदार यांची नियोजन बैठक माणगाव येथे पार पडली

उद्योजक आणि बागायतदार एम के गावडे यांनी केले मार्गदर्शन

शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली १२ रोजी होणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाला माणगाव खोऱ्यातील बागायतदार मोठ्या संख्येने सहभागी होतील

माणगाव प्रतिनिधी
माणगाव खोऱ्यातील आंबा काजू नुकसान भरपाई मिळावी यासाठी १२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे या अनुषंगाने आंबा काजू बागायतदारांची नियोजन बैठक माणगाव येथे झाली. या मोर्चाला माणगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांनी, बागायतदारांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन एम के गावडे यांनी केले.
कृषी विभागाने नव्वद टक्के आंबा काजू पिकाचे नुकसान झाल्याचा अहवाल सादर केला. राज्याचा अर्थ संकल्प सादर झाला मात्र अद्याप शासनाने नुकसान भरपाई साठी तरतूद केली नाही.
तसेच बागायतदारांना नुकसान भरपाई न मिळाल्यास शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर १२ ला मोर्चा काढणार आहेत.
या मोर्चात माणगाव खोऱ्यातील शेतकरी, बागायतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले यासाठी शेतकरी वागायतदारांची बैठक श्री गावडे पंचायत समिती सदस्य योगेश धुरी यांच्या उपस्थितीत पार पडली
यावेळी श्री. आर के सावंत,माणगाव सोसायटी चे अध्यक्ष अवि राणे, उपाध्यक्ष सीताराम कालवणकर,संचालक श्री.गावडे,प्रगत शेतकरी पांडुरंग कांबळी,श्री पांडू सावंत, श्री अशोक सावंत, श्री अण्णा पावसकर, श्री भाई सावंत, श्री.शरद म्हाडगुत आदी शेतकरी बागायदार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page