चेंदवण वेलवाडी येथील श्री गवळदेव देवस्थानकडे सौ.अर्चना बंगे यांनी स्वखर्चाने दोन सौरऊर्जा पथदीप ग्रामस्थांकडे केले प्रदान.!

कुडाळ (प्रतिनिधी)
पंचायत समिती सदस्या सौ.अर्चना बंगे यांनी आपल्या मतदारसंघात कटाक्षाने लक्ष देत असुन नुकतेच चेंदवण श्री गवळदेव देवस्थानकडे स्वखर्चातुन दोन पथदिवे देऊन ब-याच वर्षाची ग्रामस्थांची मागणी पुर्ण केल्याने ग्रामस्थांनी सौ अर्चना बंगे यांचा सन्मान केला
श्री गवळदेव देवस्थान हे अगदी जंगल भागात असल्याने तीथे धार्मिक कार्यक्रमावेळी विजेची गैरसोय होत होती या बाबत चेंदवण येथील सामाजिक कार्यकर्ते श्री प्रशांत तेंडुलकर यांनी सौ बंगे यांच्या कडे मागणी केली असता सौ बंगे यांनी धार्मिक कार्यक्रमात जाऊन दोन सौरपथदीप ग्रामस्थांकडे प्रदान केले
यावेळी प्रशांत तेंडुलकर, निलेश गुरव प्रकाश टुंबरे, सौ प्रणाली तेंडोलकर, संतोष प्रभु, प्रभाकर आडेलकर, विलास भरडकर, प्रमोद तेंडोलकर,श्री घाडी, श्री देवळी आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page