सिंधुदुर्ग प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शासकीय पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेच्या नेतृत्वाखाली आज कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयासमोर गेले दोन वर्षापासून जलजीवन मिशनच्या कामासाठी शासनाकडून पुरेसा निधी मिळत नसल्याने काम करणे अवघड बनले आहे यामुळे जिल्ह्यातील कंत्राटदारांनी आजपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे.
कामांची देयके मोठ्या प्रमाणात थकीत राहिली आहेत.निधी कधी उपलब्ध होईल याबाबत कोणतीही ठोस माहिती नसल्यामुळे सर्व कंत्राटदार सध्या आर्थिक तणावाखाली आहेत.आणि संघटनेने प्रशासनासमोर विविध 10 प्रमुख मागण्या मांडल्या आहेत त्यामुळे प्रलंबित देयके व्याजासहित तातडीने अदा करावीत. कामांना विलंब झाल्याबद्दल कंत्राटदारावर केलेली दंडात्मक कारवाई मागे घेऊन कपात केलेली रक्कम परत करावी कामाचा कालावधी संपलेल्या योजनांची सुरक्षा अनामत आणि इशारा रक्कम तात्काळ परत द्यावी निधी नसताना कामे पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारावर वेगवेगळ्या स्तरावरून आणला जाणारा नाहक बदनाम थांबवा अशी मागणी केली जात आहे. आंदोलनामुळे जिल्ह्यातील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आता शासन आणि प्रशासन यावर काय तोडगा काढते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
