बाबा सावंत यांनी किर्लोस गावाशी असलेली नाळ तुटू दिली नाही-वैभव नाईक

किर्लोस येथील प्रतिथयश उद्योजक प्रशांत उर्फ बाबा सावंत यांचा ५५ वा वाढदिवस साजरा

कुडाळ प्रतिनिधी
किर्लोस येथील प्रतिथयश उद्योजक प्रशांत उर्फ बाबा सावंत यांचा ५५ वा वाढदिवस माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत किर्लोस येथे बुधवार ८ एप्रिल रोजी केक कापून साजरा करण्यात आला.यावेळी वैभव नाईक यांच्या हस्ते बाबा सावंत यांना शाल व पुष्पहार घालून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी वैभव नाईक म्हणाले, बाबा सावंत यांनी फार मोठे कष्ट करून ते इथवर पोचले आहेत. किर्लोस गावाच्या विकासासाठी बाबा सावंत नेहमी धडपडत असतात. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून अनेकांना रोजगार देण्याचे काम सावंत बंधूनी केले आहे. प्रतिथयश उद्योजक असूनही किर्लोस गावाशी असलेली नाळ बाबा सावंत यांनी तुटू दिली नाही. गावात राहूनच ग्रामस्थांच्या अडीअडचणीला धावून जाण्याचे काम ते करीत आहेत. मराठा समाजासाठी देखील त्यांनी चांगले काम केले.अशा शब्दांत त्यांच्या कार्याचा गौरव करत वैभव नाईक यांनी बाबा सावंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी किर्लोसचे माजी सरपंच बंडू सावंत, सौ. माधुरी सावंत, सौ. पवार, उपसरपंच आपा लाड, आडवली मालडी विभाग प्रमुख अमित फोंडके,सुभाष धुरी,विकास लाड,विलास घाडीगावकर,पंढरी घाडी,बाबू घाडीगावकर,आदेश घाडीगावकर, संतोष सावंत,सचिन परब,अभिमन्यू येरम, जयराम परब, मोहन घाडीगावकर,शैलेश चव्हाण,बंटी हाटले,विजय परब आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page