वन्यजीव व वनसंबंधित तक्रारींसाठी टोल-फ्री क्रमांकांवर संपर्क साधण्याचे वन विभागाचे आवाहन;१९२६ व ०२३६३ २७२००५ वर संपर्क साधा

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी

वन विभागामार्फत नागरिकांना वनसंपदा व वन्यजीव संरक्षणाशी संबंधित तक्रारी तत्काळ नोंदविण्यासाठी टोल-फ्री हेल्पलाईन क्रमांक १९२६ उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागरिकांनी खालील बाबींसंदर्भात कोणतीही घटना घडल्यास त्वरित १९२६ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदविण्याचे आवाहन वन विभाग सावंतवाडीचे उपवनसंरक्षक मिलीश दत्त शर्मा यांनी केले आहे.
वनक्षेत्रातील बेकायदेशीर वृक्षतोड अथवा वनसंपत्तीची हानी, वन्य प्राण्यांचे दर्शन अथवा मानवी वस्तीत प्रवेश , वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान, वन्य प्राण्यांमुळे झालेल्या मानवी दुखापत किंवा मृत्यूच्या घटना, वन्यजीव व वनसंरक्षणाशी संबंधित इतर कोणतीही तक्रार असल्यास टोल-फ्री हेल्पलाईन क्रमांक १९२६ या क्रमांकावर किंवा सावंतवाडी वन विभागाच्या ०२३६३-२७२००५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधूनही तक्रार नोंदविता येईल.
वन विभाग सर्व नागरिकांना आवाहन करीत आहे की, वरील संपर्क क्रमांकांचा वापर करून तक्रारी तात्काळ नोंदवाव्यात. तक्रार वेळेत प्राप्त झाल्यास वन विभागाकडून आवश्यक ती कार्यवाही जलद गतीने करून संबंधित समस्येचे प्रभावी व वेळेवर निराकरण करण्यास मदत होईल. वनसंपदा व वन्यजीवांचे संरक्षण तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वन विभागास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page