कुडाळ (गोठोस):-
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथील कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षाच्या कृषी विद्यार्थ्यांच्या ‘ग्रामीण कृषी कार्यानुभव’ अर्थात रावे (RAWE) कार्यक्रमाअंतर्गत, “कृषी रत्न” या 9 विद्यार्थ्यांचा गट आज गोठोस गावात दाखल झाला. नऊ विद्यार्थ्यांचा गट गावात वास्तव्यास आहेत.शेतीचा अभ्यास करणार आहेत.
प्रशिक्षण कार्यक्रमाचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉ.संदीप गुरव आणि उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजय दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
गावात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांनी गोठोस ग्रामपंचायत कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. ग्रामपंचायतीचे सरपंच सुरज कदम आणि ग्रामसेविका सौ.चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. सुरुवातीला विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून देत रावे कार्यक्रमाचा उद्देश व स्वरूप समजावून सांगितले. यावेळी गावच्या शेतीविषयक समस्या, पाणी व्यवस्थापन, पायाभूत सुविधा तसेच इतर विकासकामांबाबत माहिती जाणून घेतली. गावाच्या विकासासाठी तांत्रिक मार्गदर्शन, आधुनिक शेती तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती देण्याची तयारी गटाने दर्शवली.
सरपंच श्री. कदम यांनी विद्यार्थ्यांना गावाच्या सध्याच्या गरजा व अपेक्षा यांबाबत सविस्तर माहिती दिली. ग्रामसेविका सौ. चव्हाण यांनी ग्रामपंचायतीच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी गोठोस गावचे सरपंच सुरज कदम प्रगतशील शेतकरी विष्णू तामणेकर,ग्रामसेविका सौ.चव्हाण मॅडम आदी उपस्थित होते
*भेट देणारा ‘कृषी रत्न’ गट खालीलप्रमाणे..!*
1. हर्षवर्धनसिंह उदयसिंह पाटील
2. संभाजी शिवहरी शिंगणे
3. शंतनु महेश बनकर
4. ईश्र्वर भाऊसाहबे आव्हाड
5. संकल्प सुनील शिराळकर
6. अनिरुद्ध रमेश भिसे
7. प्रणव पांडुरंग चौरे
8. सुरेश राजन थेवर
9. सुमेध महेश डांगे
गाव व विद्यापीठ यांच्यातील समन्वय वाढवण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त आहे.आगामी काळात सदर विद्यार्थी गट गावाच्या शाश्वत विकासासाठी कार्य करेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
