चेंदवण ग्रामपंचायतीत संजय गांधी निराधार योजना लाभार्थी मेळावा जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न..

चेंदवण ग्रामपंचायत येथे संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना व इतर निराधार योजनांच्या लाभार्थ्यांसाठी विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या योजनेअंतर्गत निराधार व्यक्ती, दिव्यांग, अनाथ मुले, गंभीर आजारी पुरुष व महिला यांना आर्थिक सहाय्य मिळवून देणे आणि त्यांच्या उन्नतीसाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमात बोलताना जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी सांगितले की, “ग्रामपंचायतीने गावातील गरजू लोकांना आधार देण्याचे चांगले काम केले आहे. जोमाने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा. भविष्यात जिल्हा परिषदेमार्फत लागेल ती सर्व मदत उपलब्ध करून दिली जाईल असे सांगत कार्यक्रमला शुभेच्छा देत योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
ग्रामपंचायत कार्यालयात लाभार्थ्यांच्या नोंदीचा फलक लावण्यात आला होता. महिला व पुरुष लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून योजनेची माहिती घेऊन लाभ घेतला
या मेळाव्यामुळे गावातील गरजू लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे. ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी उपसरपंच श्री माधव, सदस्य नारायण शृंगारे,भूपेश चेंदवणकर,माजी सरपंच उत्तरा धुरी,तंटामुक्ती अध्यक्ष गौतम चेंदवणकर, सामाजिक कार्यकर्ते बाळू कोचरेकर, अण्णा भरडकर आदी मान्यवर ग्रामस्थ व लाभार्थी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page