त्वरित कारवाई न झाल्यास साबा कार्यालयात ठीय्या;सौ अर्चना बंगे
वालावल पंचायत समिती मतदार संघात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात झाडी आवडलेली असुन येत्या चार दीवसात कारवाई न झाल्यास कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात ठीय्या मांडणार असा इशारा वालावल पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांनी दीला आहे
वालावल पंचायत समिती मतदार संघात नेरुर ते कवठी, वालावल ते हुमरमळा या दोन्ही रस्त्यांवर रस्ता लगत झाडी मोठ्या प्रमाणात आली असुन अपघाताचे प्रमाण वाढले असुन वारंवार मागणी करुन दुर्लक्ष केला जातो म्हणून येत्या चार दिवसात सार्वजनिक बांधकाम विभाग कुडाळ यांनी झाडी तोडुन घेण्यासंदर्भात कार्यवाही झाली नसल्यास या रस्त्यावरची टेम्पो भरुन झाडी कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात टाकुन ठीय्या मारुन लक्ष वेधले जातील असा इशारा सौ बंगे यांनी दिला आहे
