ठळक घडामोडी

झाराप तिठ्यावर मोबाईल शाॅपीसह गाळ्यांमध्ये चोरी

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप तिठा येथे असलेल्या एका मोबाईल शॉपीसह जवळच्या गाळ्यांमध्ये चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीमध्ये चोरट्यांनी १० हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, झाराप तिठा येथील वैभव कांदे (मूळ रा. वजराट) यांची मोबाईल…

Read More

सिंधुदुर्ग कृषि उत्पन्न बाजार समितीसाठी ‘शेतकरी भवन’ मंजूर;१ कोटी ५२ लाख निधीची तरतूद..

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पत्राची दखल; पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली मंजुरी ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजने’ अंतर्गत उभारणार शेतकरी भवन सिंधुदुर्ग प्रतिनिधी राज्यातील शेतकरी बांधवांना मुक्कामाची सोय व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषि उत्पन्न बाजार समितीला, नवीन “शेतकरी भवन” बांधण्यास महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय…

Read More

कुडाळ व मालवण तालुक्यात ‘क’ वर्ग पर्यटनअंतर्गत ८० लाखांचा निधी मंजूर

आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून पुरातन मंदिरांचा पर्यटन दृष्ट्या विकास होणार.* कुडाळ व मालवण तालुक्यातील एकूण १५ देवस्थानांच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजना क वर्ग पर्यटन योजनेअंतर्गत एकूण ७५ लाखांचा निधी पहिल्या टप्यात मंजूर करण्यात आला आहे. यात घावनळे येथील श्री. स्वामी समर्थ मठ परिसर सुशोभीकरण करणे- ५ लक्ष, नेरूर कविलकाटे श्री. साई मंदिर परिसर सुशोभीकरण…

Read More

व्हॉईस ऑफ मीडिया’चे राज्य अधिवेशन पंढरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चा राज्यातील पत्रकारांसाठी अनोखा उपक्रम

पंढरपूर प्रतिनिधी पंढरपूर ‘इस्कॉन’मध्ये रंगणार ‘श्रीकृष्ण भक्तीचा मेळा’, पंढरपुरी एकादशीचा खास सोहळा. सोलापूर : ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’चे राज्य अधिवेशन यंदा शनिवार, दि. १५ आणि रविवार, दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी श्री. श्री. राधा पंढरीनाथ मंदिर, ‘इस्कॉन’ पंढरपूर येथे सकाळी ९ ते रात्री ११ या वेळेत संपन्न होत आहे. ‘इस्कॉन’मध्ये ‘श्रीकृष्णा’ची भक्ती…

Read More

महाविकास आघाडीच्या वतीने उद्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे ‘ढोल बजाव, कृषिमंत्री भगाव’ धरणे आंदोलन

मविआचे पदाधिकारी, कार्यकर्ते,फळ बागायतदार शेतकरी व शेतकरी संघटना यांनी आंदोलनात सहभागी व्हावे:सतीश सावंत सिंधुदुर्ग प्रतिनिधी वारंवार मागणी करूनही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळ-पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम अद्यापपर्यंत मिळालेली नसल्याने महायुती सरकार आणि भारतीय कृषी विमा कंपनीचे कान उघडण्यासाठी उद्या गुरुवार दि. ०९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता महाविकास आघाडीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय येथे…

Read More

भूसंपादन मोबदला वाटपासाठी विशेष कॅम्पचे आयोजन..

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी लघु पाटबंधारे योजना कुंभवडे यांचा भूसंपादन प्रस्ताव क्र.12/2019 या प्रस्तवांमधील खातेदारांना मोबदला वाटप करण्यासाठी दिनांक 7 ते 10 ऑक्टोंबर 2025 या कालावधीत सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत कार्यालय कुंभवडे येथे विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उपविभागीय जलसंधारण अधिकारी सं.शिरोडकर यांनी दिली आहे. तरी संबंधीत खातेदारांची यादी तलाठी व ग्रामपंचायत कार्यालयात प्रसिध्द करण्यात आलेली…

Read More

आंजिवडे सिद्ध सातेरी मंदिर परिसर सुशोभीकरण साठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून ५ लाख निधी मंजूर.

कुडाळ (प्रतिनिधी) माणगाव खोऱ्यातील सर्वात दुर्गम आणि सर्वात शेवटचा गाव असलेल्या आंजीवडे गावाचे ग्रामदैवत श्री सातेरी मंदिर परिसर सुशोभीकरण करण्यासाठी आमदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार जिल्हा वार्षिक योजना क वर्ग अंतर्गत ५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आंजीवडे गावच्या ग्रामदेवता मंदिर सुशोभीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख…

Read More

दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यातील 13 गावांमध्ये वृक्षतोडीस बंदी

पर्यावरण संतुलनासाठी टास्क फोर्स,25 गावे इको सेन्सिटीव्ह सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी उच्च न्यायालय मुंबई यांचेकडील जनहीत याचिका क्र. 198/2014 सह 179/2012 मध्ये दि.5 डिसेंबर 2018 व दि 22 मार्च 2024 च्या आदेशाचे संपूर्ण दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यातील एकूण 13 गावांमध्ये वृक्षतोडीस बंदी घातलेली आहे. अशी माहिती सावंतवाडी दोडामार्ग टॉस्क फोर्स समितीचे सदस्य सचिव वैभव बोराटे यांनी दिली…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या भरतीसाठी उमेदवारांना विनामूल्य प्रशिक्षण शिबिर…

सिंधुदुर्ग प्रतिनिधी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती प्रक्रियेत अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी बँकेतर्फे विनामूल्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा उद्देश उमेदवारांना परीक्षेसाठी तयार करणे आणि पारदर्शक भरती प्रक्रियेबद्दल जागरूकता वाढवणे हा आहे. या मार्गदर्शन वर्गासाठी नाव नोंदवण्यासाठी बँकेने एक गुगल फॉर्म लिंक प्रसिद्ध केली आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील लिंकवर जाऊन…

Read More

जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांच्या सभापतींचे आरक्षण जाहीर..

ओरोस प्रतिनिधी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांच्या पहिल्या टप्प्यातील सभापती पदासाठी आरक्षण काढण्यात आले. त्यात सावंतवाडी अनुसूचित जाती महिला यासाठी आरक्षित झाले आहे. तर कणकवली सभापती नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, वेंगुर्ले नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण असे आरक्षित झाले आहे. तर मालवण आणि दोडामार्ग सभापती सर्वसाधारण महिला यासाठी आरक्षित झाले आहे. कुडाळ,…

Read More

You cannot copy content of this page