सावंतवाडी वरून उपवडे साय ६.३० वा सुटणारी एसटी बस पूर्ववत करा

आगार प्रमुखांचा नेहमीच अन्याय, गाडी पूर्ववत करण्याची मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे

दुकानवाड /वार्ताहर
सावंतवाडी वरुन सायंकाळी ६.३० वा. सुटणारी उपवडे एस. टी बस पूर्ववत सोडण्याची मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे.
सावंतवाडी उपवडे वस्तीची एस टी बस सायंकाळी ६.३० वा. सावंतवाडी हून नेहमी सुटत होती परंतु २/३/२६ पासुन सदरची बस सायंकाळी ७ ते ७ . ४५ पर्यंत सुटते त्या मुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात, रात्री उशीराने येत असल्याने प्रवाशांना बस मधून उतरुन घरी जाणे धोकादायक होते या भागात वन्य प्राण्यांचा मोठा वावर असतो महीला, वृध्द, शाळकरी मुले प्रवास करत असतात त्यामुळे पूर्वीप्रमाणेच सदर एस टी बस सोडण्याची मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे तसे पत्र वसोली ग्रामपंचायत व ह. नेरुर ग्रामपंचायत कडून दीले आहे याची दखल घेतली नाही तर आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा देण्यात आला आहे.
उपवडे गाडीवरच अन्याय ❓
सकाळी ८.१० वाजता सुटणारी सावंतवाडी उपवडे एसटी बस महादेवाचे केरवडे मार्गे जाते त्यामुळे प्रवाशांना नाहक आर्थिक त्रास सहन करावा लागतो . सकाळी उपवडे वरून सुटणारी गाडी सुध्दा म. केरवडे मार्गे सावंतवाडीला जाते यावेळी तर काळोखामध्ये उपवडे नेरूर चाफेली पुळास येथील प्रवाशांना म. केरवडे येथे गाडी मालाचीराय येथून येईपर्यंत उतरुन थांबावे लागते. त्यामुळे उपवडे गाडी बाबत सावंतवाडी आगार प्रमुख हे नेहमी अन्यायकारक निर्णय घेतात, सदर गाडीही पुर्ववत करण्याची मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page