मुस्लिम मतांसाठी हिंदूंचा बळी देण्याचा काँग्रेसचा प्लान उघड..

आरएसएस संघटनेवर बंदी घालण्याचे महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांचे लेखी आश्वासन

ऑल इंडिया उलमा बोर्डाला १७ मागण्या पूर्ण करण्याची लेखी दिली हमी

महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डला हाजारो कोटीची खिरापत देण्याचेही दिले आश्वासन

मुंबई (प्रतिनिधी)
मुस्लिमांच्या मतांसाठी हिंदूंचा बळी देण्याचा काँग्रेस पक्षाचा प्रकार उघड झाला आहे.हिंदू धर्माच्या विरोधात असलेल्या ऑल इंडिया उलमा बोर्डाच्या १७ मागण्या काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मान्य केला आहेत.यात हिंदू धर्मीयांचा आधारस्तंभ बनून देशभर काम करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) वर महाराष्ट्रात प्रतिबंध लावण्याचे आश्वासन महाराष्ट्र काँग्रेसने ऑल इंडिया उलमा बोर्डाला लेखी दिले आहे. महाराष्ट्र राज्यात उबाठा शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी यांचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले तर या 17 ही मागण्या मान्य करून आरएसएस वर तातडीने कारवाई करू असे आश्वासन दिले आहे.काँग्रेसच्या या आश्वासनामुळे मतांसाठी हिंदू धर्मियांवरच बंदी आणण्याची काँग्रेसची वृत्ती जनतेसमोर आली आहे.
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी ऑल इंडिया उलमा बोर्डच्या १७ मागण्या मान्य केल्या आहेत. यात महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड मध्ये दर वर्षी १००० कोटी ची तरतूद करणार,पाचशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार व बोर्डाला जमीन मिळवून देणार, मुस्लिम समाजाच्या बांधवांवर विविध गुन्हे दाखल आहेत ते सुद्धा मागे घेणार अशी सातारा आश्वासने दिली आहेत.महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्र राज्यात आल्यानंतर या मागण्या पूर्ण करणार आणि RSS वर प्रतिबंध लावणार अशी हमी देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page