वाळू व्यवसायिक माफिया किंवा गुन्हेगार नाहीत:आमदार निलेश राणे

कुडाळ प्रतिनिधी
आज कुडाळ येथील
आढावा बैठकीमध्ये आमदार निलेश राणे यांनी राज्यमंत्री योगेश कदम यांना सांगितले की, माझ्या मतदारसंघांमध्ये जी वाळू मिळते ती राज्यात कुठेही मिळत नाही. हा व्यवसाय करणारे व्यावसायिक गुन्हेगार किंवा माफीया नाहीत. वाळू संदर्भातील धोरण कोकणपट्ट्यासाठी वेगळं असलं पाहिजे. वाळू व्यवसायिकांना रॉयल्टी कमी झाली पाहिजे. जे व्यवसायिक आहेत ते शासनाच्या धोरणानुसार व्यवसाय करायला तयार आहे. मात्र त्यांना गुन्हेगार ठरवण्याचे काम यंत्रणा करत आहे. जर हा व्यवसाय बंद पडला तर सुमारे ३ हजार डंपर व्यावसायिक बेरोजगार होतील आणि त्यांचा व्यवसाय बंद झाल्यामुळे ते गुन्हेगारीकडे वळू शकतात त्यासाठी धोरण बदलणे गरजेचे आहे. यावर राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले की, हा तालुका डोंगरी मध्ये येतो त्यानुसार वाळूचे धोरण बदलण्यासाठी नक्की प्रयत्न केले जातील. याचा लिलाव लवकरात लवकर होईल. याची खबरदारी घेतली जाईल. त्यासाठी प्रशासनाने वाळूचे स्त्रोत किती आहेत याची सुद्धा पडताळणी करणे गरजेचे असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page