पत्रकारांची एकजूट ही फार महत्त्वाची,’एकत्र तर सर्वत्र’ या ब्रीदवाक्य प्रमाणे पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी संघटना:जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील
‘व्हाईस ऑफ मीडिया’च्या माध्यमातून सावंतवाडीत पत्रकार दिन साजरा..
सावंतवाडी प्रतिनिधी
सिंधुदुर्गची लाल माती ही अनेक नररत्नांची खाण आहे. त्यातील एक मुकुटमणी म्हणजे आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे आहेत. ‘दर्पण’ या प्रथम मराठी साप्ताहिकातून त्यांनी उठविलेला आवाज आज बुलंद करण्यासाठी सर्व पत्रकारांनी पत्रकारितेची गनिमा जपणे आवश्यक आहे. त्यासाठी सत्य आणि तत्व यांच्याशी निष्ठा राखणे देखील गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार तथा ‘व्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग’चे सल्लागार सीताराम गावडे यांनी केले. ‘व्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग’तर्फे पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री. गावडे बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील, सचिव शैलेश मयेकर, कार्याध्यक्ष अनंत धोंड, सहसचिव संजय पिळणकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष सिद्धेश सावंत, प्रसिद्धी प्रमुख कवी दीपक पटेकर तसेच पत्रकार प्रशांत मोरजकर नाना धोंड, साबाजी परब, आशिष धोंड, श्रीरंग सावंत आदी उपस्थित होते.
‘कार्यक्रमाच्या प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
जिल्हाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील यांनी आपल्या भाषणात संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला. ‘एकत्र तर सर्वत्र’ या ब्रीदवाक्याप्रमाणे पत्रकारांच्या न्याय्य हक्कासाठी ही संघटना ५६ देशांत कार्यरत असून, ही एकजूट शासन-प्रशासनाला जाब विचारण्यासाठी महत्त्वाची ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
