कणकवली तालुक्यातील घटना,विषारी द्रव्य प्राशन केल्याने तरुणाचा मृत्यू

कणकवली प्रतिनिधी
तालुक्यातील ओझरम माळवाडी येथील दत्तात्रय बापू वरक (वय ३८) यांचा शुक्रवारी जिल्हा रुग्णालय ओरोस येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. दत्तात्रय वरक यांनी गुरुवारी रात्री साडे आठच्या सुमारास विषारी द्रव्य प्राशन केले. परिणामी ते बेशुद्ध पडले. त्यांना नातेवाईकांनी तातडीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना पहाटे साडे चारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची खबर रामचंद्र महादेव वरक यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page