सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वाहिली श्रद्धांजली:आर.के.सावंत
कुडाळ प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे निधन ही महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखद घटना आहे. त्यांच्या जाण्याने राजकीय व सामाजिक क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे.असे प्रतिपादन कुडाळ तालुका अध्यक्ष आर.के.सावंत यांनी केले आहे.
सावंत पुढे म्हणाले निधीच्या बाबतीत त्यांनी कधी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी कमी केला नाही. कार्यकर्त्यांना नेहमीच सन्मानाची वागणूक केली त्यांच्या जाण्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली.अकाली निधनाने पवार कुटुंबीयावर अपघात झाला असून सध्याचा काळ अत्यंत कठीण आहे.या दुःखातून सावरण्यासाठी पवार कुटुंबीयांना ईश्वर बळ देवो,अशी प्रार्थना आर.के सावंत यांनी केली.
