कासार्डे येथे परवानगी संपली तरी अवैध सिलिका उत्खनन

वाळू उत्खनन तात्काळ थांबवा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा:परशुराम उपरकर

कणकवली प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कासार्डे या गावात मोठ्या प्रमाणात सिलिका वाळूचे विनापरवाना उत्खनन होऊन वाहतूक व विक्री केली जात आहे. सदर ठिकाणच्या महाराष्ट्र मिनरल कार्पेरिशन लिमिटेड यांच्या सन २०२४ ला परवानगी संपूनही त्यांचे सिलिका उत्खनन सुरु असून त्यांना परवानगी दिलेल्या क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रात उत्खनन केले जात आहे. तसेच अन्य ठिकाणीही मोठ्या प्रमाणात उत्खनन करुन सिलिका वाळू कोल्हापूर व अन्य ठिकाणी विना पास कोल्हापूरच्या फोंडा व वैभववाडी या दोन्ही घाटातून वाहतूक केली जात आहे. सिंधुदुर्गातील अवैध सिलिका व मालवण तालुक्यातील वाळू उत्खनन थांबवा, अशी मागणी माजी आ. परशुराम उपरकर यांनी जिल्हाधिका-यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

येथील अनधिकृत सिलिका वाळू उत्खननाबाबत कणकवली तहसीलदार यांनी नांक २६ मार्च २०२१ रोजी अहवाल तयार करुन जवळजवळ ३०० त्रुटी असलेल्या विविध उत्खनन करणाऱ्यांवरती दंड लावून सुमारे ४ ते ५ कोटी अनधिकृत दंड वसूली करावयाची बाकी आहे. वसूल झालेल्या अनधिकृत उत्खनन करणाऱ्या कंपनी व व्यक्तीच्या मालवत्तेवर बोजा ठेवून मालमत्तेचा लिलाव करण्याकरीता दिनांक ०२ जानेवारी २०२२ आपल्याकडे परवानगी
मागितलेली आहे. ती परवानगी अद्याप दिलेली नाही.

उत्खननाच्या काळात श्री. यादव नावाचे तलाठी होते. त्यांच्या काळात बेसुमार सिलिका वाळूचे उत्खनन झाले. त्यांची नियुक्ती मागील वर्षी कासार्डे येथे केल्याचे समजते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सिलिका बाळूचे उत्खनन व वाहतूक होत आहे. यामध्ये कासार्डे गावात नागसावंतवाडी येथे इको सेन्सिटीव्ह झोन असून येथे मोठ्या प्रमाणात उत्खनन करुन वाळू अनधिकृत धुन्याकरीता चिऱ्याचे बांधकाम करुन वाळू धुन्याकरीता टाक्या बांधलेल्या आहेत. याकडे तहसीलदार, सर्कल, तलाठी यांनी दुर्लक्ष करून कोणतीही कार्यवाही केली जात नाही. त्यावर दंड आकारणी केली जात नाही. या सिलिका उत्खननाबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी व सिलिका उत्खननाची तस्करी थांबवावी, अशी मागणी श्री. उपरकर यांनी केली आहे.

तसेच मालवण तालुक्यातील बांदिवडे, आचरा, हडी, कर्ली, पेंडूर व अन्य गावांतील नदीपात्रांमध्ये व खाडीपात्रांमध्ये मोठ्या प्रमाणात होड्यांनी हजारो परप्रांतिय कामगारांच्या सहाय्याने वाळू काढली जात आहे. आमच्या माहितीप्रमाणे वाळूचा लिलाव झालेला नसताना अनधिकृतरित्या बाळू उत्खनन केले.

जात आहे. ज्या ठिकाणी वाळू उत्खनन केले जाते.
त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिरे लावून, रॅम्प बांधून सीआरझेडचे उल्लंघन केले जात आहे.

कायदा १९७९ कायद्याअंतर्गत कामगारांची पोलीस स्टेशनला कुठेही नोंद केली जात नाही. ज्या कायद्यामध्ये तरतूद आहे की, परप्रांतिय कामगारांनी व कामगारांच्या मालकांनी स्वतः पोलीस स्टेशनला नोंद करुन सदर कामगार हे गुन्हेगारी भागातील नाहीत, याची खातरजमा करावाची आहे. मागील काळात कामगारांचे खून व मारामाऱ्या होईपर्यंत गुन्हे घडलेले आहेत. मालवण तहसीलदारांच्या माध्यमातून कामगारांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देऊन त्यांच्या राज्यात पाठविण्याचा घटना मागील ३ ते ४ वर्षात घडलेल्या आहेत. त्याचबरोबर सदर बाळूची वाहतूक गोव्याच्या दिशेने टेंपररी परमीट (टीपी) ने न घेता गोवा कर्नाटक राज्यातील गाड्या वाहतूक करतात. सदर वाहतूक ही गोवा राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनधीकृतरित्या केली जाते. अनधिकृतरित्या वाहतूक करताना दोन ब्रासच्या पासावरती चार ते सहा ब्रास वाहतूक केली जाते. किंवा विनापास, ओव्हरलोड पद्धतीने वाळू बांध्याच्या चेक पोस्टवरुन मोठ्या प्रमाणात केली जात आहे. तसेच चोरटी वाळी असल्याने भरधाव गाड्या चालवून मागील काळात ४ ते ५ अपघात झालेले असून यातील एका अपघातात कोर्टमध्ये काम करणाऱ्या महिलेचा मृत्यू झालेला आहे. यावर नियंत्रण आणणची गरज आहे. सदर वाळू वाहतूक रात्रीच्या वेळी जाते. सूर्यास्तानंतर वाळू वाहतूक
केली जाते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page