कुडाळ तहसीलदार कार्यालयासमोर शिवसेना (उबाठा),काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेच्या वतीने धरणे आंदोलन

कुडाळ प्रतिनिधी
सोमवार दिनांक 20 जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता शिवसेना (उबाठा), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेच्या वतीने कुडाळ तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले जाणार आहे. नीट परीक्षेत झालेल्या घोटाळ्यामुळे देशातील लाखो मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले. यातून निर्माण झालेल्या नैराश्यातून विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. याला सर्वस्वी शिक्षण मंत्री डॉ. धर्मेंद्र प्रसाद जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी मॅग्नेस पुरस्कार विजेते सोनम वांगचुक यांनी धरली. यासाठी त्यांनी दिल्लीतील जंतर मंतर येथे बेमुदत उपोषण केले होते. परंतु पोलीस बळाचा वापर करून शांततेत चालणारे उपोषण चिरडले गेले. ही घटना म्हणजे लोकशाहीची झालेली पायमल्ली असून सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेना (उबाठा), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेच्या वतीने सोमवारी सकाळी १०.३० वाजता तहसीलदार कार्यालय कुडाळ या ठिकाणी आंदोलन छेडल जाणार आहे. या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थी
पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख राजन नाईक, कुडाळ काँग्रेसचे अभय शिरसाठ, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शिवाजीराव घोगळे आणि मनसेचे जगन्नाथ गावडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page