पालकमंत्री नितेश राणे यांनी चिपी विमानतळ ते गोवा जेटीपर्यंत जलवाहतूक सुरू करण्यापेक्षा चिपी विमानतळावर विमानसेवा वाढविण्यासाठी प्रयत्न करावे

मुंबई ते विजयदुर्ग प्रमाणे बंद पडणारी जलवाहतूक सुरू करुन नेमकं काय साध्य होणार मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर.

कुडाळ प्रतिनिधी
पालकमंत्री नितेश राणे यांनी मुंबई मंत्रालयात आयोजित बैठकीत चिपी विमानतळ ते गोवा जलवाहतूक सुरू करण्याचे विचाराधीन असल्याचे जाहीर केले. काही दिवसापूर्वी पालकमंत्री नितेश राणे यांनी मोठा गाजावाजा करत मुंबई भाऊचा धक्का ते विजयदुर्ग जलसेवा सुरू केली होती. सदर जलसेवेचे उद्घाटन करताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कोकण साठी मोठमोठी आश्वासने देखील दिली होती. परंतु सदरची जलवाहतूक केवळ एक दोन फेऱ्यातच ठप्प पडून सध्या मात्र कायमस्वरूपी बंद पडल्याची परिस्थिती आहे. अशातच पुन्हा एकदा पालकमंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयात बैठक घेत चिपी विमानतळ ते गोवा जलवाहतूक सुरू करण्याची घोषणा केली आहे. पुन्हा एकदा अवाजवी खर्च करून बंद पडणारी जलवाहतूक सुरू करण्यापेक्षा तसेच चिपी ते गोवा जलवाहतुकीमुळे इतर राज्यातील व्यावसायिकांना फायदा पोहोचविण्यापेक्षा चिपी विमानतळावरील विमानांच्या फेऱ्या कशा वाढतील यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी शासनातर्फे ठोस उपाययोजना कराव्यात ज्यामुळे इथल्या स्थानिक नागरिकांना रोजगार निर्माण होईल व इथल्या स्थानिक व्यावसायिकांच्या व्यापारात वृद्धी होईल अशी मागणी मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page