मराठा महासंघाच्या वतीने संभाजी खाडे व तत्कालीन निवासी जिल्हाधीकारी दिनकर कदम यांचे विरुध्द तक्रार दाखल

कुडाळ प्रतिनिधी
अखील भारतीय मराठा महासंघ, सिंधुदुर्गच्या वतीने
अलीकडेच अनुकंपा तत्वावर बोगस पध्दतीने नेमणूक झालेले मुळचे बिड जिल्ह्यातील सध्या अव्वल कारकून (कुळ वहीवाट शाखा), तहसील कार्यालय, कणकवली म्हणून कार्यरत असलेले श्री. संभाजी खाडे यांच्या विरुध्द कारवाई करा अश्या आशयाचे निवेदन देण्यात आले होते. मात्र सदर निवेदन देवून सुध्दा जिल्हाधीकारी कार्यालयामार्फत महासंघाला कोणत्या स्वरूपाची कार्यवाही सुरु आहे किंवा कसे याबाबत काहीही कळवीण्यात आले नाही. महासंघाने जिल्हाधीकारी यांना दिलेल्या निवेदनात खाडे याच्या विरुध्द कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिलेला होता. सदर आंदोलनाचा पुढील भाग म्हणून महासंघाचे कुडाळ तालुकाध्यक्ष श्री. संताष दशरथ परब यांच्या वतीने आज सिंधुदुर्ग नगरी पोलीस ठाण्यात संभाजी खाडे व ज्या जिल्हाधीकारी यांनी खाडे याच्या नेमणूकीच्या आदेशावर सही केली ते दिनकर कदम यांचे विरोधात त्यांनी संगनमताने बनावट दस्तऐवज तयार करून श्री. खाडे याला गैरफायदा मिळवून दिलेला आहे व त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र शासनाचे नुकसान केलेले आहे. अशा आशयाची फिर्याद दिली. सदरची फिर्याद ही सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याने भारतीय नागरी सुरक्षा सहींता कलम 173 (3) प्रमाणे प्रार्थमीक चौकशी करीता घेतली. सदर कायदयाप्रमाणे चौदा दिवसाचे आत जर तक्रारदार यास सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याकडून काहीही कळवीण्यात आले नाही तर तक्रारदार याच्या वतीने महासंघाचे मार्फत न्यायालयात दाद मागण्यात येणार आहे. सदरची तक्रार देताना तक्रारदार संतोष परब यांच्या सोबत महासंघाचे जिल्हाध्यक्ष अॅड. सुहास सावंत, सचीव श्री. वैभव जाधव, श्री. तानाजी सावंत, श्री. भाई राणे, श्री. जनार्दन सराफदार श्री. नितीन हरमळकर, वगैरे महासंघाचे कार्यकर्ते हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page