आंबोली हे देशाच्या नकाशावर झळकणारे पर्यटन स्थळ असुन एक महीला सरपंच या गावात पर्यटन सुविधा कमी पडता कामा नये यासाठी प्रयत्न करत आहे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरीकांना अभिमानास्पद आहे;जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अतुल बंगे

आंबोली:-आंबोली हे देशातील अग्रगण्य पर्यटन स्थळ असुन
गावात पर्यटन सुविधा पुरविण्यासाठी सरपंच सौ सावित्री पालयेकर खुप मेहनत घेत आहेत हे आमच्या जिल्ह्याला भुषणावह आहे असे गौरवोद्गार जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री अतुल बंगे यांनी आंबोली येथे काढले.

श्री बंगे यांनी आज आंबोली ग्रामपंचायतीला सदीच्छा भेट दे पर्यटन गाव विकसित करताना कशा प्रकारे शासनाकडे पाठपुरावा केला जातो याची माहिती श्री बंगे यांनी सरपंच सौ सावित्री पालयेकर आणि श्री वामन पालयेकर या दाम्पत्याकडे घेतली. यावेळी श्री अतुल बंगे यांनी पालयेकर दाम्पत्यांचा श्री स्वामिंची प्रतिमा देऊन सन्मानित केले

श्री बंगे म्हणाले आंबोली हे गाव देशाच्या पर्यटन नकाशावर पोचविण्यासाठी इथल्या राजकीय मंडळींनी प्रयत्न केले परंतु पालयेकर यांच्या सारखी एक महीला धडाडीने इथे काम करते आहे हे पाहुन खुप समाधान वाटले.

आंबोली गावात पर्यटन सुविधा

आंबोली गावात केंद्राकडून, महाराष्ट्र राज्याकडुन निधी आणुन त्या निधीचा विनियोग ग्रामपंचायत माध्यमातून योग्य प्रकारे करुन आंबोलीचे पर्यटन स्थळ याचा विकास हेच ध्येय पाहीले जाते.

आंबोली गावातील लोकांची विकासाच्या दृष्टीने एकजुटी आि पर्यटकांना होणारे सहकार्य हे कौतुकास्पद

सरपंच सौ सावित्री पालयेकर दाम्पत्यांचे काम “कौतुकास्पद”

श्री वामन पालयेकर आणि सरपंच सौ सावित्री पालयेकर अग जोमाने विकास कामांसाठी झोकुन देऊन काम करत आहेत.

प्रशासक असुन उपसरपंच आणि सर्व सदस्य यांचे मोलाचे सहकार्य

आंबोली ग्रामपंचायत निवडणुक जवळ आली असुन सध्या प्रशासक म्हणून सरपंच, उपसरपंच व सदस्य सध्या कारभार जरी सांभाळत असले तरी सर्वांना सोबत घेऊन आंबोली गावातील सोयी सुविधा पहील्या जात आहेत हे खरोखरच कौतुकास्पद आहे.

आंबोली ग्रामसेवक श्री गोसावी अभ्यासु

या ग्रामपंचायतीला पारदर्शक कारभार सांभाळण्यासाठी आि योग्य मार्गदर्शन करण्यासाठी ग्रामसेवक श्री गोसावी हे अभ्या ग्रामसेवक लाभले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page