जि.प.सदस्य रुपेश पावसकर यांनी जि.प.अध्यक्ष यांचे वेधले लक्ष; शिक्षणाधिकाऱ्यांना सखोल चौकशी करण्याचे दिले आदेश
सिंधुदुर्ग प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय व खाजगी शाळा महाविद्यालय मध्ये बेकायदेशीर वह्या पुस्तके व स्टेशनरी यांची विक्री करून पालक व विद्यार्थ्यांकडून अमाफ फी आकारली जात आहे या संदर्भात जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी जि. प.अध्यक्ष यांच्या सोबत सविस्तर चर्चा करून सदर बाब अध्यक्षांच्या निदर्शनास आल्याने अध्यक्षांनी शिक्षणाधिकाऱ्यांना सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. तर गोरगरीब विद्यार्थी व पालकांना होणार भुर्दंड अन्यायकाक असून निंदनीय असल्याचे रुपेश पावसकर यांनी म्हटले आहे.
