चार वेळा जनतेचा विश्वास,चार वेळा जनादेश; हीच आमदार दीपकभाई केसरकर यांच्या कार्याची पोचपावती;सिद्धेश (भाई) परब(उपजिल्हा प्रमुख शिवसेना)

वेंगुर्ला प्रतिनिधी
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपकभाई केसरकर यांनी तब्बल अकरा वर्षांनंतर वेंगुर्ला तालुक्याची आमसभा घेतली. या आमसभेत शंभरहून अधिक विषयांवर सविस्तर चर्चा झाली. विविध विकासकामांबाबत सूचना मांडण्यात आल्या, अनेक ठराव करण्यात आले तसेच अभिनंदनाचे ठरावही मंजूर करण्यात आले.
एवढ्या मोठ्या संख्येने विषय असतानाही आमसभा शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि सकारात्मक वातावरणात पार पडली. ही बाब लोकप्रतिनिधी आणि जनतेमधील विश्वासाचे नाते अधोरेखित करणारी असल्याचे सिद्धेश परब उपजिल्हा प्रमुख शिवसेना तथा माजी उपसभापती, पंचायत समिती वेंगुर्ला
यांनी सांगितले.
दीपकभाई केसरकर हे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. जनतेने वारंवार त्यांच्यावर दाखविलेला विश्वास ही त्यांच्या कार्याची आणि जनसंपर्काची खरी पोचपावती आहे. जनतेचे प्रश्न समजून घेणे, प्रशासनाशी समन्वय साधणे, विकासकामांना चालना देणे आणि सर्वसामान्यांशी सातत्याने संवाद ठेवणे ही त्यांच्या कार्यपद्धतीची वैशिष्ट्ये असल्याचे परब यांनी नमूद केले.
वेंगुर्ला तालुक्यात दीपकभाई केसरकर यांच्या कार्यावर विश्वास ठेवणारा मोठा वर्ग असून, आमसभेला मिळालेला प्रतिसाद हे त्याचेच उदाहरण आहे. चार वेळा मिळालेला जनादेश हा केवळ निवडणुकीतील विजय नसून त्यांच्या नेतृत्वाला, कार्याला आणि जनतेशी असलेल्या नात्याला मिळालेली पोचपावती आहे, असेही सिद्धेश परब यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page