कुडाळ (प्रतिनिधी)
स्मार्ट प्रीपेड मिटर बसवु नये यासाठी आंदोलन उभे झाले तरीही चोरुन मीटर बसवल्याने चारशे रुपये बिला ऐवजी चार हजार बिले येत आहेत विज ग्राहक ही बिले भरुच शकत नाहीत याबाबत शासनाने ग्राहकांचा सहानुभूती पुर्वक विचार करावा अशी मागणी शिवसेनेचे अतुल बंगे यांनी केली आहे
स्मार्ट प्रिपेड मिटर बसवु नये यासाठी मोठे आंदोलन मा आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली झाले यावेळी विज मंडळ अधिकारी यांनी हे मिटर बसवले जाणार नाही असे लेखी पत्र देऊन सुद्धा सध्या गावागावात विज मिटर बदलुन स्मार्ट प्रीपेड मिटर बसवले जात असून गावातील विज ग्राहक यांनी विरोध केला तरी स्थानिक वायरमन यांच्या दबावाखाली विज मिटर बसविले जात आहेत
जे मिटर नविन बसवलेत त्यांची बिले चारशे च्या ऐवजी चारहजार येत असल्याने ही बिले भरणे सर्व सामान्य ग्राहकांना शक्य होत नसल्याने ग्राहक हतबल झाले आहेत असे सांगुन श्री बंगे म्हणाले अजुनही शासनाने विचार करुन स्मार्ट प्रीपेड बसविण्यात येऊ नये अशी मागणी श्री बंगे यांनी केली
प्रीपेड स्मार्ट मिटर बसवल्याने चारशे रुपयांच्या येणारी विज बिले चार हजार पर्यंत येत असल्याने सर्व सामान्य ग्राहक हैराण:शिवसेनेचे अतुल बंगे
