माजी सरपंच सावित्री पालेकर:हॉटेल व्यावसायिकांचे मोठे नुकसान!कायमस्वरूपी वायरमन उपलब्ध करून द्यावा
आंबोली मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून महावितरण ची 33 kv ची लाईन आंबोली सब स्टेशन ला येते व तिथून पुढे 11 kv ची लाईन आंबोली, गेळे, चौकूळ या तिन्ही गावात जाते व तेथून पुढे प्रत्येक वाडीवर व घरारघरात व हॉटेल व्यावसायिक यांना ट्रान्सफरमर च्या माध्यमातून विधुत पुरवठा केला जातो.
आंबोली, गेळे, चौकूळ मध्ये कंत्राटी पद्धतीने कामकरणारे 4 महावितरण चे कर्मचारी आहेत जे सर्व प्रकारचे प्रयत्न विधुत पुरवठा सुरळीत करण्यासाठी करतात मात्र जेव्हा एकाद्या ट्रान्सफरमर काही बिघाड झाला किंवा विधुत वहिनी तुटली तरी त्या ठिकाणी मुख्य विधुत वहिनी बंद करणे किंवा सुरु करणे या साठी जे परमिट आंबोली सब स्टेशन मधून घ्यावे लागते ते कंत्राटी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देता येत नाही व त्या मुळे जे दुरुस्ती चे काम एक तासात करता ते काम करण्यासाठी एक एक दिवस किंवा त्या पेक्षा जास्त कालावधी लागत आहे.
आंबोली मध्ये सद्या मान्सून पर्यटन हंगाम सुरु आहे. मोठया प्रमाणात पर्यटक कर्नाटक, गोवा व इतर राज्ये तसेच महाराष्ट्र भरातून येतात मात्र हॉटेल्स मध्ये लाईट नसल्याने ते सद्या त्यांचे रेसेर्व्हशन कॅन्सल करत आहेत किंवा ज्यांनी वास्त्याव्याला आहेत ते तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. तासन तास लाईट नसल्याने हॉटेल मधील अन्न पदार्थ देखील खराब होत आहेत.
या सर्व गोष्टीचा परिणाम प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष आंबोली तील हॉटेल व्यवसाहीकानावर होत आहे. आंबोली मध्ये जे हॉटेल व्यवसाय उभे राहत आहेत हे येथील व्यवसाहिकांनी स्वतःचे स्वतः उभे केले आहेत मात्र महावितरण च्या भोंगळ कारभार मुळे आज ते आर्थिक अडचणीत सापडत चालले आहेत.
आंबोली मा. सरपंच तथा प्रशासक सौ सावित्री पालेकर यांची सध्या च्या वेळेस प्रमुख मागणी आहे की आंबोली, गेळे, चौकूळ मध्ये पर्मनंट वायरमन उपलब्ध व्हावा ज्याला ट्रान्सफरमर किंवा 11 kv च्या विधुत वाहिनीवरील दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक असलेले किमान परमिट तरी भेटेल.
या बाबत महावितरण च्या अधिकारी यांच्या कडे मागणी करून सुद्धा त्यांना या बाबत चे गांभीर्य नाही आहे त्यामुळे आंबोली, गेळे, चौकूळ मधील जनता व हॉटेल व्यवसाहिक महावितरण च्या कार्यालयावर धरणे आंदोलन करण्याच्या तयारीत आहे तसेच या बाबत जाब आम सभे मध्ये ही उपस्थित करणार आहे.
व जे नुकसान येथील व्यवसाहिकांचे होत आहे त्याची भरपाई चीही मागणी महावितरण कडे करणार आहे.
त्यामुळे आंबोली, गेळे,चौकूळ या ठिकाणी त्वरित पर्मनंट वायरमन महावितरण ने उपलब्ध कराव.
