गोठोस येथे राजाराम खरात यांच्या घराचे वादळी वाऱ्यामुळे पत्रे उडून नुकसान

कुडाळ तालुक्यात काल सायंकाळी सुमारास झालेल्या मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे अनेक भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यात गोठोस
धनगरवाडी येथील शेतकरी राजाराम खरात यांच्या घराचे पत्रे उडून गेल्याच्या घटना घडली आहे.

दरम्यान
मोठ्या प्रमाणात पाऊस व सुसाट्याचा वारा यामध्ये कुडाळ तालुक्यात नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. महसूल विभागाकडून तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत मिळावी.अशी मागणी शेतकरी राजाराम खरात यांच्याकडून होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page