कुडाळ दि.९ :-
दहावीच्या निकालाचा क्षण हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा असतो.वाडोस गावातील जयप्रकाश नारायण माध्यमिक विद्यालय वाडोस शाळेची विद्यार्थिनी कु.प्रार्थना संतोष कदम यांनी दहावी परीक्षेमध्ये 94.20% गुण मिळवून प्रशालेत प्रथम क्रमांक प्राप्त केला त्याबद्दल लोकसेवा संघ उपाध्यक्ष व सर्वोदय सहकारी पतसंस्था माणगाव अध्यक्ष बाळकृष्ण बेळणेकर यांनी त्यांच्या घरी जाऊन शाल व श्रीफळ देऊन अभिनंदन केले.
यावेळी भाजपा कुडाळ तालुका सरचिटणीस भाई बेळणेकर, संजय सावंत,डॉ.श्रीनिवास बेळणेकर,संतोष सावंत,दिनेश सुभेदार,महेश झिमने,उदय म्हाडगूत, सागर जाधव,उमेश म्हाडगुत ,विजय म्हाडगूत, ओंकार तावडे,बबन कदम आदी उपस्थित होते.
सर्वोदय सहकारी पतसंस्था माणगाव अध्यक्ष बाळकृष्ण बेळणेकर यांच्याकडून दहावीतील यशस्वी विद्यार्थिनी कु.प्रार्थना संतोष कदम हिचे अभिनंदन
