महसूल विभागच्या भोंगळ कारभारा मुळे आंबोली ग्रामस्थ अडचणीत:आंबोली मा.सरपंच सौ सावित्री पालेकर
आंबोली प्रतिनिधी
जुलै व ऑगस्ट महिन्यात आंबोली परिसरात मोठया प्रमाणात पाऊस पडला, कित्येक वेळा पूर परीस्थिती निर्माण झाली, घाटातील रस्त्यावर झाडे, दरड पडली, ग्रामस्थांच्या घरावर झाडे पडली, जोरदार वाऱ्यामुळे लोकांनी घरांची, वाड्यांची छपरे उडाली,विधूत वाहिन्या पडल्या,१० ते १५ दिवस लाईट नव्हती.
आंबोली मध्ये जे पर्जन्य मापक IMD च्या वतीने बसाविण्यात आले होते ते सोलर ऊर्जेवर कार्यान्वित होते व आंबोली मधील दाट धुके व अतिवृष्टी या मुळे ते योग्य प्रकारे काम करत नाही.
आंबोली मधील भाऊ ओगले यांच्या कडे मॅन्युअल पर्जन्य रेकॉर्ड आहे त्यात आंबोली मध्ये मोठया प्रमाणात पाऊस पडल्याची नोंद.
आंबोली तील बऱ्याच ग्रामस्थांच्या घरावर, मांगरावर झाडे पडली, वादळी वाऱ्यामुळे घरांची, छपरे उडाली मात्र एकही नुकसान ग्रस्त आंबोली वासियांला एकही रुपया महसूल विभाग कडून देण्यात आला नाही.आंबोली मध्ये पाऊस च पडला नाही व वादळी वारे ही सुटले नाही अशा प्रकरचा अहवाल च्या आधार सर्व नुकसान भरपाई ची प्रकरणे अपात्र करण्यात आली.
वर्षानुवर्षे आंबोली परिसरातील येतील प्रलंबित कबूलयतदार जमीन प्रश्न मुळे वेगवेगळ्या शासकीय लाभ व अनुदाणा पासून वंचित राहत आले आहेत.
गेली कित्येक वर्षे आंबोली वासीय अतिवृष्टी,वन्य प्राण्यामुळे होणारी शेती नुकसान, शासकीय योजना पासून वंचित राहत आहेत.
त्यात भर म्हणून की काय आता आंबोली मध्ये पाऊस पडलाच नाही व वादळी वारे सुटलेच नाही असा अहवाल कोणतीही शाहनिशा न करता व प्रत्यक्ष वस्तू स्तिती चा विचार न करता महसूल विभाग मान्य करून आंबोली तील नुकसान ग्रस्तांना वंचित ठेवण्यात आले
