ठळक घडामोडी

भजन परंपरा जोपासण्यासाठी ग्रामीण भागातील युवक कायमच पुढे असतात:शिवसेनेचे अतुल बंगे!

कुडाळ प्रतिनिधी ग्रामीण भागातील युवक कायमच भजन परंपरा जोपासण्यासाठी पुढाकार घेऊन भजन स्पर्धा आयोजित करतात ही अध्यात्माकडची यशस्वी वाटचाल आहे असे गौरवोद्गार शिवसेनेचे नेते अतुल बंगे यांनी काढले स्वरसंगित भजन मंडळ हरीचरणगिरी कोंडुरा आयोजित विठ्ठल पंचायतन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा स्तरीय भजन स्पर्धा उद्घाटन श्री बंगे यांच्या हस्ते झाले यावेळी श्री बंगे बोलताना म्हणाले पं…

Read More

जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधत कुडाळ येथील कष्टकरी,जिद्दी व आपल्या जगण्यातून आदर्श निर्माण करणाऱ्या माता-भगिनींचा सन्मान..

आजची महिला कोणत्याही क्षेत्रात आघाडीवर दिसते:जिल्हाध्यक्षा मानसी परब आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन चा पुढाकार.. कुडाळ प्रतिनिधी केवळ मानवी जीवनच नव्हे तर स्त्रीशिवाय अवघे जगचं अपूर्ण आहे. इतरांच्या सुखासाठी ती आयुष्यभर तडजोड करते. कुटुंबाच्या प्रगतीशिल वाटचालीसाठी आजीवन झटते. स्वतःच्या भाव-भावनांना तिलांजली देऊन परपरिवाराच्या सुखासाठी अविरत श्रम करते. आई, आजी, पत्नी, बहीण, मुलगी व आदर्श गृहिणी अशा…

Read More

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील ग्रामीण भागातील शाळांमधील मुलींना 5000 सॅनिटायझर नॅपकिन्स चे वाटप..

महिला दिनानिमित्त स्टार युनियन दायइची लाइफ इन्शुरन्स कंपनीचा उपक्रम.. कणकवली प्रतिनिधी ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्टार युनियन दायइची लाइफ इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील ग्रामीण भागातील शाळांमधील मुलींना 5000 सॅनिटरी नॅपकिन्स वाटप करण्यात आले, सदर कार्यक्रमाची सुरुवात आज कनेडी हायस्कूल मध्ये करण्यात आली सदर हायस्कूलमधील मुलींसाठी 1000 सॅनिटरी नॅपकिन्स आज…

Read More

कमर्शियल व्हेईकल एक्सपोचे सावंतवाडीत आयोजन

अनेक बेरोजगार युवक-युवतींना यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार,आयोजकांचे मानावे तेवढे आभार थोडे:आ.दिपक केसरकर सावंतवाडी प्रतिनिधी अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग आणि सिंधू विकास संशोधन व कौशल्य विकास संस्था कुडाळचा अभिनव उपक्रम कौतुकास्पद आहे. अनेक बेरोजगार युवक-युवतींना यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. युवक, महीलांना कर्ज उपलब्ध होऊन स्वतःच वाहन खरेदी करत स्वतःचा व्यवसाय करता येणार…

Read More

राष्ट्रवादी शरद पवार गटातील शेकडो कार्यकर्ते भाजपात दाखल..

मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश उबाठानंतर शरद पवार राष्ट्रवादीला राणेंचा धक्का.. सावंतवाडी प्रतिनिधी राज्याचे बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी उबाठा शिवसेनेनंतर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. राष्टवादी श.प. गटाचे ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सिद्धेश तेंडूलकर यांच्यासह…

Read More

नेरूर तर्फ हवेली येथे बिबट्या मादी सापडली मृत अवस्थेत…

कुडाळ प्रतिनिधी तालुक्यातील नेरूर ता. हवेली मध्ये साईगाव येथे बिबट्या मादी मृतावस्थेत आढळली आहे. साईगाव येथील रहिवासी सूर्यकांत भिकाजी कुंभार यांनी खुलासा वन विभागाला खबर दिली वनविभागाने घटनास्थळी जात पाहणी केली. बिबट्याचे शव आकेरी येथील वनविश्रामगृह येथे आणून त्याचे पशुवैदयकीय अधिकारी कुडाळ यांच्या शवविच्छेदन करून त्याचे दहन करण्यात आले. दरम्यान मृत्यूचे नेमके कारण समजण्यासाठी बिबट्या…

Read More

कुडाळ लक्ष्मीवाडी येथे मंजूर झालेल्या विकास कामाचे भूमिपूजन नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांच्या हस्ते

. कुडाळ प्रतिनिधी कुडाळ शहरातील लक्ष्मीवाडी येथे मंजूर झालेल्या विकास कामाचे भूमिपूजन नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी माज़ी जि. प. सदस्य संजय भोगटे, शिवसेना तालुकाप्रमुख अरविंद करलकर, शहरप्रमुख रोहित भोगटे, नगरसेविका नयना मांजरेकर, नगरसेविका चांदनी कांबळी, नगरसेविका श्रुति वर्दम, माजी नगरसेवक राकेश कांदे, शाखाप्रमुख योगेश काळप, चंदन कांबळी, प्रथमेश कांबळी, राकेश…

Read More

पारंपरिक मच्छिमार आमचे प्राधान्य,त्यांचेवर अन्याय होऊ देणार नाही

पारंपरिक मच्छीमारांच्या पोटावर लाथ मारू शकत नाही,मंत्री राणे यांनी दिले थेट उत्तर उर्वरित रक्कम लवकरच अदा करू ,नियम तोडून मासेमारी करणाऱ्यांवर कारवाई होणारच, मुंबई प्रतिनिधी एलईडी मच्छीमारांना कुठल्याही परिस्थितीत मदत होणार नाही . पर्सनेट मासेमारी समुद्र किनाऱ्यापासून १२ नॉटिकल मैल आत नियमात राहून करणे आवश्यक आहे. त्याच्याबद्दल सदस्यांच्या भावना विचारत घेऊन चौकटीत राहून काम करू.मात्र…

Read More

जागतिक महिला दिनानिमित्त छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस येथे कराटे व स्वसंरक्षण शिबिराचे आयोजन..

सिंधुदुर्ग प्रतिनिधी छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस, ओरोस येथे ८ मार्च रोजी सकाळी 9.30 वाजता एक दिवसीय कराटे व स्वसंरक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. सदर प्रशिक्षण हे निशुल्क आहे. या शिबिरात सहभागींना कराटे, कर्व मागा ( इजरायली मार्शल आर्ट्स ), प्रभावी ब्लॉकिंग आणि एस्केपिंग स्ट्रॅटेजीज, परिस्थितीजन्य जागरूकता आणि वैयक्तिक सुरक्षा नियोजन यासारख्या आवश्यक स्वसंरक्षण कौशल्यांची…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस विभागाच्या “सोशल मिडीया लॅबच्या” इमारतीचे भूमीपूजन संपन्न

सिंधुदुर्ग प्रतिनिधी इंटरनेट हे सध्या कोणत्याही प्रकारची माहिती सहज प्राप्त करण्याचे व दळणवळणाचे प्रमुख साधन बनले असून दिवसेंदिवस त्याचा अगणित वापर होताना दिसत आहे. इंटरनेटच्या व सोशल मिडियाच्या चांगल्या उपयोगाबरोबरच समाजविघातक प्रवृत्ती, गुन्हेगार यांचेकडून सामाजिक अशांतता, धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणारे संदेश, व्हीडिओ व ऑडिओ क्लिप प्रसारीत करणे, वैयक्तिक स्वार्थासाठी इतर व्यक्तींची बदनामी करणे,…

Read More

You cannot copy content of this page